शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

कुरार पोलिसांची कारवाई; कर्ज देण्याच्या आमिषाने गंडविणाऱ्या टोळीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 9:32 PM

टोळीतील चौघांना अटक करुन रोख रक्कमेसह कागदपत्रे जप्त केली आहेत.

ठळक मुद्दे मुंबई व परिसरातील अनेकांना फसविले असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली.कोणताही सबळ पुरावा हाताशी नसताना सोशल मीडियाचा वापर करीत पोलिसांनी त्यांना पकडले आहे.

मुंबई - गरजू नागरिकांना खासगी बॅँकेतून कर्ज मंजूर केल्याचे सांगत मासिक हप्ताच्या (ईएमआय) बदल्यात धनादेश घेवून गंडा घालणारे रॅकेट कुरार पोलिसांनी उघडकीस आणला आहे.टोळीतील चौघांना अटक करुन रोख रक्कमेसह कागदपत्रे जप्त केली आहेत.गुरमिठा सिंग दलवंत सिंग, गुजराल (वय ३३रा. सायन), बिरेन कौशीक पुरोहित (४४,रा. दौलतनगर ,बोरिवली),परेश शांतीलाल हिगू (२९, रा.साईबाब नगर, बोरिवली) व जीगर धीरजलाल कारलिया (३५,मिरा रोड) अशी त्यांची नांवे आहेत. कोणताही सबळ पुरावा हाताशी नसताना सोशल मीडियाचा वापर करीत पोलिसांनी त्यांना पकडले आहे. सर्वांना १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहेत. त्यांनी मुंबई व परिसरातील अनेकांना फसविले असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली.कुरार येथील क्रांतीनगरात रहात असलेल्या सुरेशकुमार चौबे यांना २० ऑगस्टला मोबाईलवर फोन करुन कर्ज देण्याचे आमिष दाखविले. त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी कर्ज घेण्याची तयारी दर्शविल्यानंतर दुसऱ्यादिवशी एकजण त्यांच्या घरी पाहणी करण्यासाठी आला. एचडीएफसी बॅँकेतून आलो असल्याचे सांगून कर्ज मंजूर केले आहे, त्यासंबंधी कागदपत्रे व बॅँकेचे अकाऊंट नंबर घेतला. त्याचप्रमाणे हप्तयाच्या बदल्यात चार चेक घेतले, त्यावर पेन्सिलने कॅन्सलेशनची नोंदणी करीत खात्यावर एक लाख रुपये शिल्लक ठेवण्याचे सांगून तो निघून गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या धनादेशावर प्रत्येकी २५ हजार रक्कम घालित बॅँकेतून काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चौबे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. भामट्यांनी चौबे यांना केलेले मोबाईल फोन व अन्य तपशीलही चुकीचा होता. त्यामुळे त्यांच्या घरी कर्ज मंजुरीसाठी चौकशीच्या बहाण्याने आलेल्या गुरुमिंठश सिंग या तरुणाची फेसबुकवरुन माहिती काढून शोध घेतला. त्याच्याकडून मिळालेल्या अन्य तिघांनाही अटक केली.

 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसा