शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे बळ पडले क्षीण; वैद्यकीय तपासणीला आणलेला आरोपी पळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 17:31 IST

हिसका देवुन पळुन जाण्यापर्यंत आरोपींची मजल गेल्याने पोलिसांचे बळ क्षीण झाल्याची शहरात चर्चा

बारामती : शहरातील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण पोलिसांनी आणलेला आरोपी पोलिसांच्या हाताला हिसका देवुन पळुन गेल्याचा प्रकार बुधवारी(दि ६) सायंकाळी घडला.या प्रकारामुळे पोलिसांची कार्यक्षमता उघड झाली आहे. हिसका देवुन पळुन जाण्यापर्यंत आरोपींची मजल गेल्याने पोलिसांचे बळ क्षीण झाल्याची चर्चा शहरात होती.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी अमोल ज्ञानदेव नरुटे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे.सोन्या उर्फ सोनल गणेश इंगळे (वय १९, रा. तांदूळवाडी, बारामती) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी(दि ६) सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला. तालुका पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी सोन्या उर्फ सोनल गणेश इंगळे याच्यासह भीमराज बबन गायकवाड, गणेश उर्फ प्रेम सचिन रणपिसे, प्रमोद उर्फ पिंटू आण्णा गावडे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या आरोपींना बारामती उपकारागृहातून पुण्याच्या येरवडा कारागृहात वर्ग करण्याचा तोंडी आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी  दिला होता. तसेच खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी किशोर उर्फ बाबू विजय भापकर (वय २६ , रा. मेडद, ता.बारामती) याची रवानगी येरवडा कारागृहात करण्याचे आदेश पोलिसांना मिळाले होते. त्यामुळे या सर्व आरोपींनी घेवून पोलिस कर्मचारी खासगी वाहनाने येथील सिल्व्हर ज्युबिली शासकिय रुग्णालयात आले. यावेळी आरोपी इंगळे याने माज्या पोटाची शस्त्रक्रिया झाली असल्याने शौचाला येत  आहे,त्यासाठी स्वच्छता करण्याचा  बहाणा केला. त्यासाठी पोलिस कर्मचारी नरुटे हे त्याला घेवून शौचालयाकडे गेले. तो बाहेर आला असताना हाताला पकडून त्याला घेवून निघाले होते.यावेळी आरोपी नरुटे यांच्या हाताला हिसका  देत तेथून पळुन गेला.आरोपी पोलीसांच्या कायदेशीर रखवालीतुन पळुन गेला आहे.अधिक तपास शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक पद्मराज गंपले करत आहेत. 

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक