शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी उन्मेष जोशींची ७ तास चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 20:45 IST

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र आणि बांधकाम व्यावसायिक उन्मेष जोशी यांची ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) ७ तास चौकशी केली.

ठळक मुद्दे झालेली चौकशी समाधानकारक झाल्याचा दावा उन्मेष जोशींनी केला याप्रकरणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील लवकरच चौकशीला सामोरं जाण्याची शक्यता आहे.  

मुंबई - कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र आणि बांधकाम व्यावसायिक उन्मेष जोशी यांची ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) ७ तास चौकशी केली. झालेली चौकशी समाधानकारक झाल्याचा दावा उन्मेष जोशींनी केला असून ईडी पुन्हा चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. याप्रकरणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील लवकरच चौकशीला सामोरं जाण्याची शक्यता आहे.  कोहिनूर प्रकरणी ईडीकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बांधकाम व्यावसायिक उन्मेष जोशी यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार उन्मेष हे आज दुपारी ईडीच्या कार्यालयात हजर झाले. मला नोटीस मिळाली असून ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आलो आहे. मला ईडीकडून कोणतेही प्रश्न पाठण्यात आलेले नाहीत. मी त्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे जोशी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. ईडीच्या कार्यालयात पोचल्यानंतर जोशी यांची ७ तास चौकशी करण्यात आली. सायंकाळी ७ वाजताच ते ईडीच्या कार्यालयातून बाहेर आले. 

नेमकं काय प्रकरण ?

उन्मेष जोशींनी काही सहकाऱ्यांच्या पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू केला होता. त्यात इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अँड एफएस) या सरकारी क्षेत्रातील कंपनीने २२५ कोटींची गुंतवणूक केली होती. कालांतराने जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ९० कोटीला कंपनीचे समभाग विकले होते. त्यानंतर देखील कंपनीला अगाऊ कर्ज देण्यात आलं होतं. या कर्जाचा परतावा करण्यात आला नव्हता. त्यामुळे कोहिनूर सिटी एनएलने २०११मध्ये काही मालमत्ता विकून ५०० कोटींचा परतावा करण्याच्या करारावर सही केली होती. त्यामुळे आयएल अँड एफएसकडून कोहिनूरला पुन्हा १३५ कोटींचं कर्ज देण्यात आलं होतं. या प्रकरणात अनियमितता आढळून आल्याने ईडीने त्याची चौकशी सुरू केली आहे.

उन्मेष जोशी यांना विचारण्यात आलेले प्रश्न 

कोहिनुर सिटीएनएल ही कंपनी कधी आणि कशी स्थापन करण्यात आली ?

या कंपनीत किती पार्टनर होते ?

कंपनीचे क्लाइंट कोण कोण आहेत ?

त्यांचा व्यवसाय काय होता ?

कंपनीने कोणा कोणाकडून कर्ज घेतले होते ? 

आता पर्यंत कोणाचे किती कर्ज फेडले ?

अचानक 2008 मध्ये नुकसान कसे झाले ?

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयRaj Thackerayराज ठाकरे