शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! तीन वर्षांच्या मुलाने खेळता खेळता 8 महिन्यांच्या बाळावर झाडली गोळी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 19:31 IST

Crime News : एका तीन वर्षांच्या मुलाने आठ महिन्यांच्या बाळाला गोळी झाडली असल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

ह्युस्टन - अमेरिकेच्या (America) ह्यूस्टन (Houston) मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तीन वर्षांच्या मुलाने आठ महिन्यांच्या बाळाला गोळी झाडली असल्याची भयंकर घटना समोर आली आहे. खेळता खेळता चिमुकल्याने आपल्या लहान भावावर गोळी चालवल्याची माहिती मिळत आहे. शुक्रवारी ही भीषण घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाच्या पोटात गोळी लागली आहे. तसेच गोळी झाडल्याचे समोर येताच बाळाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. 

ह्यूस्टन पुलिस विभागाचे पोलीस अधिकारी वेंडी बॅमब्रिज यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अतिशय दुख:द घटना आहे. या तीन वर्षाच्या मुलाला घरात ठेवलेली बंदूक सापडली असणार आणि त्यातून त्याने ही गोळी झाडली असावी अशी शक्यता त्यांनी वर्तवण्यात येत आहे. आई-वडिलांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचं तपासात समोर आलं आहे. वेंडी बॅमब्रिज यांनी पालकांना आपल्या मुलांकडे नीट लक्ष द्या असं आवाहन देखील केलं आहे. तसेच याचा अधिक तपास सुरू असल्याचं म्हटलं आहे. 

बॅमब्रिज यांनी बंदूक आणि शस्त्रे लहान मुलांच्या हाती लागू नये याची काळजी घेण्याचे आवाहन केले. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलिसांना या प्रकरणातील बंदूक सापडत नव्हती. मात्र, ती बंदूक कारमध्ये पोलिसांना आढळली. या कारमधून कुटुंबीयांनी जखमी बाळाला रुग्णालयात नेले होते. चौकशी करणारे पोलीस आणि वकील या प्रकरणात दोषारोप ठेवले जावे की नाही, याबाबत विचारविनिमय करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भयंकर! छापेमारीसाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला जमावानं घेरलं; बेदम मारहाण करत केली हत्या

 बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. छापेमारी करण्यासाठी गेलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला संतप्त जमावाने बेदम मारहाण करत हत्या भयंकर घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार. बिहारमधील किशनगंज नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी अश्विनी कुमार (Ashwini Kumar) हे एका लुटमारीच्या प्रकरणात छापेमारी करण्यासाठी ते बंगालमध्ये गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत पोलिसांचं एक विशेष पथकही होतं. दरम्यान हिंसक जमावाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली आहे. या प्रकारानंतर पोलीस विभागात संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारीFiringगोळीबारDeathमृत्यूPoliceपोलिस