kishanganj inspector ashwini kumar beaten to death in west bengal | भयंकर! छापेमारीसाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला जमावानं घेरलं; बेदम मारहाण करत केली हत्या

भयंकर! छापेमारीसाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला जमावानं घेरलं; बेदम मारहाण करत केली हत्या

नवी दिल्ली - बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. छापेमारी करण्यासाठी गेलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला संतप्त जमावाने बेदम मारहाण करत हत्या भयंकर घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार. बिहारमधील किशनगंज नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी अश्विनी कुमार (Ashwini Kumar) हे एका लुटमारीच्या प्रकरणात छापेमारी करण्यासाठी ते बंगालमध्ये गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत पोलिसांचं एक विशेष पथकही होतं. दरम्यान हिंसक जमावाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली आहे. या प्रकारानंतर पोलीस विभागात संताप व्यक्त केला जात आहे.

डीजीपी एस के सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या डीजीपीशी चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी घडलेल्या प्रकरणाबाबत दुःख व्यक्त केलं असून शहीद पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांनी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. छापेमारी करण्यासाठी आलेल्या पथकाने दरोडेखोरांनी अचानक केलेल्या हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. मात्र एका पोलीस अधिकाऱ्याला लोकांनी पकडलं. त्यानंतर बेदम मारहाण केली आहे. या दुर्दैवी घटनेत संबंधित पोलीस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणाच्या  चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

अश्विनी कुमार एका हे एका लुटमारीच्या प्रकरणाचा तपास करत होते. यावेळी तपासादरम्यान बिहारमध्ये घडलेल्या या गुन्ह्याचे धागेदोरे परराज्याशी संबंधित असल्याची त्यांना माहिती मिळाली. अश्विनी कुमार आपल्या काही कर्मचाऱ्यांसोबत छापेमारी करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये गेले होते. यावेळी पश्चिम बंगालच्या दिनाजपूर जिल्ह्यातील पांजीपाडा पोलीस हद्दीतील पनतापाडा गावात छापेमारी सुरू केली होती. दरम्यान आरोपींना वाचवण्यासाठी गावातील जमावाने थेट पोलिसांच्या पथकावर हल्ला केला.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे चार वाजता ही घटना घडली आहे. परिसरात अजून अंधार असल्याने ठाणेदार अश्विनी कुमार हल्लेखोरांच्या तावडीत सापडले. यावेळी संतप्त जमावाने अश्विनी कुमार यांच्यावर हल्ला चढवत लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान हल्लेखोरांनी त्यांचा गळा आवळल्याचीही माहिती समोर आली आहे. पोलीस अधिकारी अश्विनी कुमार यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: kishanganj inspector ashwini kumar beaten to death in west bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.