शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

22 वर्षीय मॉडेलवर फाईव्हस्टार हॉटेलमध्ये बलात्कार; मुंबईच्या तरुणावर FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 5:29 PM

Crime news, Rape on Model in Delhi: दिल्लीच्या चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात 22 वर्षांच्या तरुणीने बलात्कार झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी ही तक्रार गंभीरतेने घेत एफआयआर दाखल केला आहे.

देशात निर्भया कायद्याची अंमलबजावणी दिल्लीतील बलात्कार प्रकरणामुळे (Nirbhaya Rape Case) झाली होती. आजही दिल्ली महिलांसाठी असुरक्षित असून फाईव्ह स्टार हॉटेलमध्येही महिला सुरक्षित नसल्याची घटना घडली आहे. मॉडेल असलेल्या तरुणीने पोलीस ठाण्यात जाऊन बलात्काराची तक्रार केली यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (Rape on Model girl in Delhi by South mumbai's resident.)

दिल्लीच्या चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात 22 वर्षांच्या तरुणीने बलात्कार (Rape on model girl) झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी ही तक्रार गंभीरतेने घेत एफआयआर दाखल केला आहे. तरुणी मॉडेल आहे. मुंबईहून तिचा एक जुना ओळखीचा तरुण दिल्लीला आला होता. येथे आल्यानंतर त्यांने तरुणीला भेटण्यासाठी खान मार्केटमध्ये बोलावले. तिथे तो तिला एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे गेल्यावर त्याने तरुणीला चुकीची, अश्लिल वागणूक दिली. एवढेच नाही तर आरोपीने पीडित तरुणीला धमकीही दिली. या घटनेनंतर तरुणीने थेट पोलीस ठाणे गाठले आणि आपबीती सुनावली. हा तरुण त्याचे वडील आणि अन्य एका नातेवाईकासोबत दिल्लीला आला होता. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ते उतरले होते. या तरुणाने अन्य एका हॉटेलमध्ये रुम बुक केला आणि त्या मॉडेल तरुणीला तिथे घेऊन गेला. 

तक्रारीनुसार मुलीने सांगितले की, आरोपीने तिला 30 जानेवारीला मेसेज करून दिल्लीतील एका लग्न समारंभाला येत असल्याचे सांगितले होते. तेव्हा आपण भेटू असेही सांगितले होते. 20 फेब्रुवारीला त्यांना पहाटे 5 वाजता मेसेज केला होता व भेटण्यासाठी त्याने एका मित्राच्या घरी बोलावले होते. तेव्हा त्या तरुणीने त्याला नकार दिला होता. यानंतर दोघेही खान मार्केटमध्ये भेटले, तिथे दोघांनी नाश्ता केला. यानंतर आरोपी पीडित तरुणीला घेऊन हॉटेलमध्ये गेला. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी सांगितले की, तक्रार मिळाल्यावर एफआयआर दाखल केला आहे. तपास सुरु आहे. 

तरुण दक्षिण मुंबईतीलपीडितेच्या वकिलांनी सांगितले की, तरुणीवर बलात्कार करणारा तरुण हा दक्षिण मुंबईतील आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तरुणीची वैद्यकीय चाचणी झाली आहे. तसेच तिचा जबाबही नोंदवला आहे. तरुण मोठ्या कुटुंबातील आहे. या दोघांची आधी ओळख होती. 

टॅग्स :MolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली