शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
3
Top Marathi News LIVE Updates: रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्ती'ला मुदतवाढ?, १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता
4
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
5
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
6
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
7
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
9
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
10
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
11
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
12
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
14
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
15
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
16
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
17
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
18
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
19
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
20
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जलकुंभ देखरेखीखाली !

By admin | Updated: March 5, 2015 00:03 IST

लातूर : लातूर शहरात पाणीपुरवठ्यासाठी पाच जलकुंभ आहेत़ तर निलंगा व उदगीर शहरातही पाणीपुरवठ्यासाठी जलकुंभ तयार केले आहेत़

लातूर : लातूर शहरात पाणीपुरवठ्यासाठी पाच जलकुंभ आहेत़ तर निलंगा व उदगीर शहरातही पाणीपुरवठ्यासाठी जलकुंभ तयार केले आहेत़ मात्र या जलकुंभाची सुरक्षा व काळजी घेतली जात नसल्याची ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशननंतर निदर्शनास आले़ याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, लातूर शहरातील पाणीपुरवठ्याचे पाचही जलकुंभ २४ तास देखरेखीखाली असतील याचे नियोजन केले जाणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठ्याची योजना कालच महानगर पालिकेकडे आली आहे. मनपा व एमजीपीच्या कर्मचाऱ्यांत चर्चा करून जलकुंभावर २४ तास देखरेख ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बुधवारी शहरातील पाचही जलकुंभावर कर्मचाऱ्यांचा पहारा होता.लातूर शहरातील गांधी चौकातील आणि यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुलाच्या पाठीमागे असलेल्या जलकुंभावर कसलीही सुरक्षा नसल्याचे तसेच अस्वच्छता असल्याचे ‘लोकमत’ चमूने मंगळवारी केलेल्या स्टींग आॅपरेशननंतर उघडकीस आले आहे. याची दखल घेत बुधवारी मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी शहरातील पाचही जलकुंभाची माहिती घेतली. पाणी वितरणासाठी किती कर्मचारी आहेत. जलकुंभावर रक्षक म्हणून किती कर्मचारी आहेत. त्यांच्या कामाच्या वेळा काय आहेत. त्यांच्या कामाचे नियोजन कोण करते. जलकुंभावर २४ तास मनुष्यबळ ठेवण्यास काय अडचणी आहेत. आदी बाबींचा आढावा घेतला. १ मार्चपर्यंत पाणीपुरवठ्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे होती. जलकुंभावरही त्यांचेच कर्मचारी आहेत. बिलभरणा केंद्रही त्यांचेच आहेत. कालच जीवन प्राधिकरणाकडून ही योजना मनपाकडे आली आहे. त्यामुळे दोघांचा विचार घेऊन जलकुंभावर २४ तास पहारा ठेवण्याचा निर्णय मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी घेतला आहे. गांधी चौकातील जलकुंभवर कर्मचारी असतात. नांदेड नाका येथील जलकुंभावरही कर्मचारी आहेत. बार्शी रस्त्यावरील जलकुंभावर जीवन प्राधिकरणाचे कार्यालयच आहे. त्यामुळे येथे कर्मचारी असतात. फक्त यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुलाच्या आणि औसा रोड असलेल्या जलकुंभावर पहारा नाही. या दोन्ही ठिकाणी कर्मचारी ठेवण्याचे नियोजन केले जात असल्याची माहिती मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी दिली. ‘लोकमत’मुळे चांगला निर्णय घेतला असल्याचेही ते म्हणाले.दरम्यान, बुधवारी शहरातील पाचही जलकुंभावर महानगरपालिकेचे कर्मचारी दिसून आले. आमच्या छायाचित्रकाराने गांधी चौक आणि नांदेड नाका तसेच यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुलाच्या पाण्याच्या टाकीवर कालच्याप्रमाणे चढण्याचा प्रयत्न केला. पण आज त्यांना हटकण्यात आले. फोटो काढू नका, आमची नोकरी आहे, साहेब. काल तुम्हीच फोटो काढून पेपरात दिले. त्यामुळे आज दिवसभर आम्हाला येथे बसावे लागले आहे, असे म्हणून फोटो काढण्यास त्या कर्मचाऱ्याने विरोध केला.