हैदराबाद-मुंबई विशेष रेल्वेत आता छ. संभाजीनगरकरांनाही मिळणार समान जागा; 'कोटा' पद्धत रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 17:10 IST2026-04-20T17:10:12+5:302026-04-20T17:10:29+5:30

हैदराबादचा 'विशाल कोटा' इतिहासजमा! छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे प्रवाशांना दिलासा; उन्हाळी सुट्टीत प्रवासाची चिंता मिटली.

Victory for Passengers! Equal Reservation Quota for Chh. Sambhajinagar in Hyderabad-Mumbai Special Train. | हैदराबाद-मुंबई विशेष रेल्वेत आता छ. संभाजीनगरकरांनाही मिळणार समान जागा; 'कोटा' पद्धत रद्द

हैदराबाद-मुंबई विशेष रेल्वेत आता छ. संभाजीनगरकरांनाही मिळणार समान जागा; 'कोटा' पद्धत रद्द

छत्रपती संभाजीनगर: मध्य रेल्वेने सुरू केलेल्या हैदराबाद-मुंबई (सीएसएमटी) साप्ताहिक विशेष रेल्वेतील आरक्षण कोट्यावरून झालेला वाद अखेर मिटला आहे. यापूर्वी हैदराबादसाठी मोठा वाटा राखून संभाजीनगर आणि नांदेडसाठी अत्यंत मर्यादित जागा ठेवण्यात आल्या होत्या. या अन्यायावर 'लोकमत'ने १६ एप्रिल रोजी 'उन्हाळ्यासाठी विशेष रेल्वे दिली, पण जागा झाल्या कमी' या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत रेल्वेने आता कोटा पद्धत काढून सर्वांसाठी समान आरक्षण प्रक्रिया सुरू केली आहे.

'जो प्रथम बुकिंग करेल, त्याला जागा'
नवीन निर्णयानुसार, आता हैदराबाद, नांदेड किंवा छत्रपती संभाजीनगर येथून तिकीट बुक करताना प्रवाशांना रेल्वेतील एकूण उपलब्ध जागांमधून आरक्षण मिळवता येणार आहे. रेल्वेच्या प्रणालीमध्ये आता तिन्ही ठिकाणांहून स्लिपर क्लासच्या ४०८, एसी-२ टायरच्या २१ आणि एसी-३ टायरच्या २५९ जागा आरक्षणासाठी सारख्याच दाखवल्या जात आहेत.

असे असेल वेळापत्रक
२३ एप्रिल ते ९ जुलै या कालावधीत ही विशेष रेल्वे धावणार आहे. मुंबईहून हैदराबादकडे जाणारी रेल्वे (०१०११) दर गुरुवारी सकाळी ७:४० वाजता छत्रपती संभाजीनगर स्थानकावर येईल. तर हैदराबादहून मुंबईकडे जाणारी रेल्वे (०१०१२) दर शुक्रवारी सकाळी १०:१० वाजता संभाजीनगर स्थानकावर येऊन १०:१५ वाजता मुंबईकडे रवाना होईल. या निर्णयामुळे उन्हाळी सुट्टीत मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title : हैदराबाद-मुंबई ट्रेन: छत्रपति संभाजीनगर को समान सीट; कोटा रद्द।

Web Summary : हैदराबाद-मुंबई विशेष ट्रेन पर कोटा प्रणाली हटी। अब, छत्रपति संभाजीनगर के यात्रियों को सीटों तक समान पहुंच मिलेगी। सभी पहले आओ, पहले पाओ के आधार पर उपलब्ध सीटें बुक कर सकते हैं। इससे गर्मी की यात्रा में राहत मिलेगी।

Web Title : Hyderabad-Mumbai Train: Chhatrapati Sambhajinagar gets equal seat access; Quota abolished.

Web Summary : Quota system removed on Hyderabad-Mumbai special train. Now, Chhatrapati Sambhajinagar passengers get equal access to seats. All can book available seats on a first come, first served basis. This provides relief for summer travel.