सुट्टीत घरी आलेल्या चिमुकल्यांवर काळाचा घाला; शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 20:00 IST2026-05-13T19:55:36+5:302026-05-13T20:00:39+5:30

सिल्लोडमध्ये काळजाचा थरकाप! शिवना येथील मेंढपाळाच्या दोन मुलांचा शेततळ्यात बुडून करुण अंत; आई-वडिलांचा हंबरडा पाहून गाव हेलावले

Tragic Incident in Sillod: Two Brothers Drown in Farm Pond During Summer Vacation | सुट्टीत घरी आलेल्या चिमुकल्यांवर काळाचा घाला; शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू

सुट्टीत घरी आलेल्या चिमुकल्यांवर काळाचा घाला; शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू

सिल्लोड/शिवना: सिल्लोड तालुक्यातील शिवना परिसरात बुधवारी (दि. १३) सकाळी ११ वाजेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. मेंढपाळ रामदास साबळे यांची दोन मुले, गौरव (वय १२) आणि गोपाल (वय १०), यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी दहा दिवसांपूर्वीच घरी आलेल्या या चिमुकल्यांना काळाने हिरावून नेले आहे.

शिक्षणासाठी बाहेरगावी, सुट्टीसाठी घरी
रामदास साबळे हे शिवना गावापासून ३ किमी अंतरावर असलेल्या किन्ही फाटा येथे वास्तव्यास आहेत. पारंपरिक मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या साबळे यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे, यासाठी त्यांना बाहेरगावी पाठवले होते. मोठा मुलगा गौरव हा फुलंब्री येथील न्यू ओएसिस इंग्रजी शाळेत, तर धाकटा मुलगा गोपाल हा सिल्लोड येथील स्वामी विवेकानंद इंग्रजी शाळेत शिक्षण घेत होता. सुट्टी लागल्याने दोघेही घरी आले होते, मात्र नियतीने त्यांच्यावर घाला घातला.

हृदयद्रावक अंत
कालपर्यंत अंगणात खेळणाऱ्या आपल्या पोटच्या गोळ्यांचे मृतदेह पाहून आई-वडिलांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. ज्या खांद्यावर ही मुले खेळायची, त्याच खांद्यावरून त्यांचा मृतदेह नेण्याची वेळ वडिलांवर आल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title : छुट्टियों में घर आए दो भाइयों की तालाब में डूबने से मौत

Web Summary : सिल्लोड के शिवना के पास एक खेत तालाब में डूबने से 10 और 12 साल के दो भाइयों की मौत हो गई। वे बोर्डिंग स्कूल से गर्मी की छुट्टी के लिए घर आए थे, तभी यह दुखद घटना हुई। लड़के स्थानीय चरवाहे रामदास साबले के बेटे थे। समुदाय इस विनाशकारी नुकसान पर शोक मना रहा है।

Web Title : Tragedy Strikes: Two Brothers Drown in Farm Pond During Vacation

Web Summary : Two brothers, aged 10 and 12, drowned in a farm pond near Shivna, Sillod. They were home for summer vacation from boarding school when the tragic incident occurred. The boys were the sons of a local shepherd, Ramdas Sable. The community mourns the devastating loss.