शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

इंदूरचा गुलाब अन् राजस्थानच्या गुलालाची उधळण; धुलीवंदनानिमित्त नाथ मंदिरात फाग उत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 17:57 IST

दहा क्विंटल फुलांची उधळण करीत नाथमंदीरात फाग उत्सव साजरा... 

- संजय जाधव
पैठण:
राधाकृष्णांच्या होळी गिताच्या जल्लोषात राजस्थान नाथद्वाराच्या विशेष गुलालासह लाखो गुलाब पाकळ्यांची उधळण करून मंगळवारी धुलीवंदनानिमित्ताने नाथांच्या मंदिरात आगळा वेगळा 'फाग उत्सव' साजरा करण्यात आला. फाग उत्सवात गुलालाची व फुलांची उधळण करण्यासाठी मोठ्या संख्येने महिला व पुरूष भाविकांनी हजेरी लावल्याने मंदिर खचाखच भरले होते. विविध रंगाची उधळण करत सर्वत्र रंगपंचमी साजरी करण्यात येते. मात्र पैठण येथील नाथांच्या मंदीरात रंगा ऐवजी विविध फुलांची उधळण करून ' फाग उत्सव ' साजरा करण्यात आला. 

होळी उत्सवा संबंधी मराठी, ब्रजभाषा, हिंदी, राजस्थानी आदि भाषांचे विविध भजन, गवळणीचे गायन करण्यात आल्याने मंदिरात जल्लोष पूर्ण वातावरण तयार झाले.  नाथ मंदिरात रंगाच्या ऐवजी फुलांच्या पाकळ्या उधळून रंगपंचमी साजरी होते. यासाठी यंदा सुगंधीत चैत्री गुलाब इंदौर, जालना, सांगली, पुणे अशा विविध भागातून मागवण्यात आला होता. तर  गुलालाची उधळण करण्यासाठी विशेष गुलाल नाथद्वारा (राजस्थान) येथून आणला होता. 
मंगळवारी दहा क्विंटल फुले उधळून मंदिरात फाग महोत्सव साजरा करण्यात आला असे गोवत्स परिवाराचे गणेश महाराज लोहीया यांनी सांगितले.  फाग उत्सवात बद्री महाराज नवल,  किशोर चौहान,आनंद लोहिया,पवन लोहिया, नाथवंशज मिलिंद गोसावी, श्रेयस गोसावी, पुष्कर गोसावी,परीक्षीत गोसावी,पुष्कर लोहिया,योगेश लोहिया,बलराम लोळगे, विनय रावस, हार्दिक सराफ, गणेश लोहिया,श्रीकांत सारडा, मधुसूदन मुंदडा, आदीसह मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी होऊन आनंद लुटला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHoliहोळी 2023