शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक अधिकाऱ्यास लाच घेताना केले जेरबंद

By admin | Updated: February 1, 2015 00:58 IST

तामलवाडी : मंजूर असलेल्या विहिरीचे अनुदान देण्यासाठी एक हजार रूपयांची लाच घेणारे पंचायत समितीचे तांत्रिक अधिकारी उमेश बळीराम माळीबनकर यांना जेरबंद करण्यात आले़

तामलवाडी : मंजूर असलेल्या विहिरीचे अनुदान देण्यासाठी एक हजार रूपयांची लाच घेणारे पंचायत समितीचे तांत्रिक अधिकारी उमेश बळीराम माळीबनकर यांना जेरबंद करण्यात आले़ ही कारवाई शनिवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने काटी येथे केली़पोलिसांनी सांगितले की, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर मंजूर व्हावी, यासाठी तक्रारदाराने गत पाच वर्षापूर्वी ग्रामपंचायतीकडे रितसर अर्ज केला होता़ मागील सात-आठ दिवसापूर्वी तक्रारदारास मग़्रा़रो़ह़योजनेंतर्गत १ लाख ८९ हजार रूपये विहीर कामासाठी अनुदान मंजूर झाल्याचे पत्र मिळाले होते़ तक्रारदार यांनी काही अनुदान घेत विहीर खोदण्यास सुरूवात केली होती़ त्यानंतर पुढील कामासाठी तक्रारदारांनी पंचायत समितीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे विचारपूस केली़ मात्र, तेथे त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती़ त्यानंतर त्यांनी पंचायत समितीतील तांत्रिक अधिकारी यांची भेट घेतली़ तेव्हा तांत्रिक अधिकारी उमेश बळीराम माळीबनकर यांनी १००० रूपये दिल्याशिवाय अनुदानाचे पुढील बील काढणार नसल्याचे सांगितले़ त्यानंतर तक्रारदारांनी उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती़ या तक्रारीनंतर एसीबीचे पोलीस अधीक्षक डी़एस़स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक नेकलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी भोसले यांच्यासह पोनि आसिफ शेख, सपोफौ भगत, पोना डोरले, तोडकर, पोकॉ नाईकवाडी, मोरे, चालक चिखलीकर आदीच्या पथकाने शनिवारी दुपारी काटी येथे सापळा रचला़ त्यावेळी माळीबनकर यांनी १००० रूपये लाचेची मागणी करून स्वीकारल्यानंतर कारवाई करण्यात आली़ या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ तपास पोनि शेख हे करीत आहेत़ (वार्ताहर)रोहयोअंतर्गत विहिरीचे अनुदान मंजूर झाल्यानंतर त्यांनी ५१ हजार रूपये उचलले होते़ त्यांनतर विहिरीचे ३० फूट खोदकाम करण्यात आले़ विहिरीच्या पुढील खोदकामासाठी त्यांनी अनुदानाची मागणी केली होती़ मात्र, अनुदान देण्यासाठी १ हजार रूपयांची लाच त्यांच्याकडे मागण्यात आले होते़