शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनेमध्ये संघर्षाचे वारे

By admin | Updated: November 23, 2014 00:24 IST

जगदीश पिंगळे , बीड समान काम अन् समान वेतन आणि ऊसाला रास्त भाव या मागणीसाठी मराठवाड्यासह राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी मजूर संघर्ष यात्रा काढणार आहेत.

जगदीश पिंगळे , बीड समान काम अन् समान वेतन आणि ऊसाला रास्त भाव या मागणीसाठी मराठवाड्यासह राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी मजूर संघर्ष यात्रा काढणार आहेत. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कालीदास ‘लोकमत’ शी बोलतांना म्हणाले, ऊसाला ३५०० भाव द्यावा आणि समान काम समान वेतन ही आमची मुख्य मागणी आहे. समान काम समान वेतन, या नियमाची पायमल्ली सतत होत गेली आहे. हार्वेस्टर मशिनला प्रति टन ५२५ रू. दिले जातात तर मजुराला फक्त १९० रुपये. ही तफावत गेल्या अनेक वर्षापासून आहे. संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवनेरी येथून २५ नोव्हेंबर रोजी ऊसउत्पादक संघर्षयात्रा निघणार आहे. ती मराठवाडयातील सर्व जिल्ह्यातून जाणार असून १२ डिसेंबर रोजी हुतात्मा बाबूगेनू स्मृतीदिनी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर समारोप आहे. कापसाला प्रतिटन ७००० रुपये भाव मागणाऱ्यांनीच सत्तेत आल्यानंतर ३७०० रुपये भाव घोषित केला. हे कसे असा सवालही यावेळी उपस्थित केला. या संघर्ष यात्रेत साखर कारखानदार, ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊस तोडणी मजूर हे सहभागी होणार आहेत असे ते म्हणाले. राज्यात यंदा साधारण २०५ कारखान्यांपैकी ११० कारखाने सुरू आहेत. ऊसाच्या अंतिम खरेदीवर ४ टक्के कर शासनाने माफ केला आहे. त्यामुळे ८०० कोटी रूपये कारखानदाराकडे उपलब्ध होतील असेही आपेट म्हणाले. शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष परमेश्वर पिसुरे म्हणाले, २८ नोव्हेंबर रोजी उमापूर येथे संघर्ष यात्रा आल्यानंतर सभा होईल. कऱ्हाड येथील परिषदेत पहिला हप्ता ३५०० रू द्यावा, सी. रंगराजन समितीच्या शिफारसी जशाच्या तशा लागू करा, हार्वेस्टरप्रमाणे मजुराना वेतन द्या, शेतमालाचा भाव ठरविण्यासाठी न्यायाधिकरणाची स्थापना करा हे ठराव संमत झाले. महाराष्ट्र राज्य शेतमाल भाव समितीने केलेल्या शिफारसी आणि केंद्र शासनाने जाहीर केलेली आधारभूत किंमत यातील तफावतीची रक्कम राज्य सरकारने शेतकऱ्यांना द्यावी हा कळीचा मुद्दा आहे असे आपेट म्हणाले.