शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
3
Top Marathi News LIVE Updates: रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्ती'ला मुदतवाढ?, १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता
4
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
5
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
6
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
7
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
9
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
10
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
11
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
12
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
14
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
15
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
16
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
17
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
18
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
19
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
20
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

औंढा नागनाथ येथे खुलेआम गुटखा विक्री

By admin | Updated: August 4, 2014 00:52 IST

औंढा नागनाथ : गुटखा विक्रीला बंदी असतानासुद्धा औंढ्यात ठिकठिकाणी खुलेआम गुटख्याची विक्री होताना दिसून येत आहे. या भागात सुमारे दोनशे पानटपऱ्यांमधून ही विक्री राजरोसपणे होत आहे.

औंढा नागनाथ : गुटखा विक्रीला बंदी असतानासुद्धा औंढ्यात ठिकठिकाणी खुलेआम गुटख्याची विक्री होताना दिसून येत आहे. या भागात सुमारे दोनशे पानटपऱ्यांमधून ही विक्री राजरोसपणे होत आहे. राज्य शासनाने मागील वर्षापासून गुटखा विक्रीवर बंदी घातली आहे. औंढा नागनाथ येथे हिंगोली- परभणी राज्य रस्त्यालगत व मंदिर परिसरात अशा दोनशेच्या वर पानटपऱ्या आहेत. या माध्यमातून गुटखामाफिया विविध कंपनीच्या गुटखा पुड्यांचा पुरवठा पद्धतशीरपणे करतात. त्याच प्रमाणे काही ठराविक किराणा दुकानांतून सुुुुद्धा या गुटख्यांच्या पुड्या पानपट्टी धारकांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत. एक रुपयांची पुडी १० रुपयाला विक्री होत आहे. पानटपरीपेक्षा पुरवठादार जादा मुनाफा घेऊन पैसे कमावताना दिसून येत आहे. याकडे अन्न व भेसळ विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहे. औंढा नागनाथ हे तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. त्यांच्याकडून गुटखा विक्रेते दामदुप्पट किंमत घेऊन गुटख्यांची विक्री करीत असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष औंढा हे तीर्थक्षेत्र असून अधिकाऱ्यांचे गुटखा विक्रीकडे दुर्लक्ष होत आहे.मंदिर परिसरातच गुटखा विक्री सुरू आहे.