शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

संजय कासलीवालविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

By admin | Updated: June 24, 2017 23:54 IST

औरंगाबाद :फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर संजय कासलीवाल यांच्याविरुद्ध शुक्रवारी रात्री उशिरा क्रांतीचौक ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : प्लॉट, रो हाऊस, फ्लॅट आणि जमिनीमध्ये भागीदारी देण्याचे अमिष दाखवून व्यावसायिकाची ८ कोटी ६१ लाख ८०हजार २८४ रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर संजय कासलीवाल यांच्याविरुद्ध शुक्रवारी रात्री उशिरा क्रांतीचौक ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखा मागील काही महिन्यांपासून या तक्रारीची चौकशी करीत होती.याविषयी प्राप्त माहिती अशी की, मूळचे जालना येथील रहिवासी पंकज अग्रवाल (३३) हे शहरातील वेदांतनगर येथे स्थायिक झाले आहे. आरोपी संजय कासलीवाल यांनी तक्रारदार याच्या वडिलांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून सप्टेंबर- नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांच्या व्यवसायात गुंतवणुक करण्यास भाग पाडले. त्या बदल्यात शहरात आणि लगतच्या ठिकाणची मालमत्ता देण्याचे कबुल करुन त्यांच्याकडून ८ कोटी ६१ लाख ८० हजार २८४ रुपये घेतले. या मालमत्तेची नोंदणीकृत रजिस्ट्री करुन देण्याची तयारी त्यांनी दर्शविली होती. याविषयीचा ई-मेल त्यांनी तक्रारदार अग्रवाल यांना पाठविला. तसेच काही धनादेश दिले. दरम्यान तक्रारदार यांच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर त्यांनी तक्रारदार यांनी कासलीवाल यांच्याकडे ठरल्याप्रमाणे मालमत्तेची रजिस्ट्री करुन देण्याचे सांगितले. मात्र त्यांनी रजिस्ट्री करुन दिली नाही. आणि धनादेश बँकेत टाकू नका, रक्कम आज देतो, उद्या देतो, असे केले. यानंतर अग्रवाल यांनी दोन महिन्यांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. या तक्रारीची चौकशी सहायक पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे करीत होते. शुक्रवारी रात्री गुन्हा नोंदविण्याची कारवाई क्रांतीचौक ठाण्यात सुरू होती.बिल्डर कासलीवाल म्हणाले की, हा सावकारीचा व्यवहार होता आणि तो पूर्णही केला. नंतर दुसऱ्या व्यवहारासाठी अग्रवाल यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यासाठी आमची प्रॉपर्टी तारण ठेवण्याची तयारी दर्शवून याविषयीचा ई-मेल पाठविला होता. मात्र, हा व्यवहारच न झाल्याने त्या प्रॉपर्टीचा नोंदणीकृत करारनामा करण्याचा प्रश्नच नाही. यात कोणताही गुन्हा नाही.