शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
3
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
4
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
5
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
6
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
7
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
8
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
9
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
11
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
12
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
13
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
14
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
16
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
17
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
18
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
19
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
20
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

मतदानासाठी नागरिक सज्ज

By admin | Updated: October 15, 2014 00:48 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या बुधवारी मतदान होणार आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या बुधवारी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतदानासाठी सर्व निवडणूक कर्मचारी आजच मतदान यंत्र व इतर साहित्य घेऊन आपापल्या केंद्रांवर दाखल झाले. उद्या जिल्ह्यात २४ लाख ८८ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.सर्व नऊ मतदारसंघांत एकूण १५६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वाधिक ३० उमेदवार औरंगाबाद पूर्व मतदारसंघात आहेत, तर सर्वात कमी १२ उमेदवार कन्नड मतदारसंघात आहेत. जिल्हाभरात एकूण २७४७ मतदान केंदे्र असणार आहेत. या केंद्रांवर सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी १६ हजार ८०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत, तसेच सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय सीआरपीएफ, एसआरपी, सीआयएसएफच्या १२ कंपन्याही दाखल झाल्या आहेत. मतदान उद्या होणार असले तरी त्यासाठी सर्व निवडणूक कर्मचारी आजच आपापल्या केंद्रावर पोहोचले. तत्पूर्वी, प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयात सकाळी निवडणूक कर्मचारी प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम), व्हीव्हीपॅट मशीन आणि इतर मतदान साहित्य वाटप करण्यात आले. त्यानंतर दुपारी १२ वाजेनंतर निवडणूक कर्मचारी नेमून दिलेल्या केंद्रांकडे बस आणि जीपमधून रवाना होण्यास सुरुवात झाली. दुपारी २ वाजेपर्यंत सर्व कर्मचारी मतदारसंघाच्या कार्यालयातून बाहेर पडले. यातील बहुतेक कर्मचारी मतदान साहित्यासह दुपारीच आपापल्या केंद्रांवर पोहोचले. दूरच्या अंतरावरील कर्मचारीही सायंकाळपर्यंत केंद्रांवर दाखल झाले. निवडणूक कर्मचाऱ्यांसोबत सर्व मतदान केंद्रांवर पोलीस कर्मचारीही आजच पोहोचले. प्रत्येक केंद्रात एक पोलीस कर्मचारी तैनात असणार आहे. याशिवाय मतदान केंद्रांबाहेरही मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत.