शहरं
Join us  
Trending Stories
1
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
2
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
3
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
4
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
5
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
8
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
9
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
10
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
11
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
12
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
13
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
16
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
17
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
18
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
20
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानक,गाड्यांची सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Updated: June 13, 2014 00:31 IST

विजय बगाटे , पूर्णा रेल्वेस्थानक व धावत्या रेल्वे प्रवासी गाड्यांमधील प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे प्रवाशांना शारीरिक व मानसिक त्रास सोसावा लागत आहे.

विजय बगाटे , पूर्णा
रेल्वेस्थानक व धावत्या रेल्वे प्रवासी गाड्यांमधील प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे प्रवाशांना शारीरिक व मानसिक त्रास सोसावा लागत आहे.
पूर्णा हे मराठवाड्यातील रेल्वेचे मोठे जंक्शन असून १०० वर्षाचा इतिहास पूर्णा रेल्वेस्थानकाला आहे. येथून मुंबई, दिल्ली, कलकत्ता, अमृतसर, भोपाळ, अलाहाबाद, तिरूपती, विशाखा पटनम, पाटना, मनमाड, हैदराबाद, सिकंदराबाद, नागपूर, अदिलाबाद, पंढरपूर, इंदौर, बंगळुरू, कोल्हापूर, बिदर यासह देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वे गाड्या दररोज व आठवडी टाईमटेबल्या हिशोबाने धावत असतात. या गाड्यांपैकी देवगिरी, नंदीग्राम व अजिंठा या दोन तीन गाड्या वगळता एकाही एक्सप्रेस गाडीला सुरक्षा व्यवस्था किंवा सुरक्षागार्ड ठेवले जात नाही. सर्व गाड्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे अनेक गाड्यांत चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पूर्णा रेल्वेस्टेशनवर रेल्वे सुरक्षा बलाचे स्वतंत्र कार्यालय आहे. परंतु अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सुरक्षा पुरविण्याविली जात नाही. नागपूर रेल्वे पोलिसांची चौकी असून पोलिस स्टेशन नांदेड येथे आहे. चौकीत केवळ दोन ते तीन कर्मचारी कार्यरत असल्यामुळे रेल्वेस्टेशनला देखील ते सुरक्षा देऊ शकत नाहीत. रेल्वेचे मोठे जंक्शन असताना देखील या ठिकाणचे रेल्वे पोलिस स्टेशन नांदेड येथे वर्ग करण्यात आल्यामुळे पूर्णा रेल्वे जंक्शनची सुरक्षा व प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात आली आहे. दररोज ४० ते ५० लांब पल्ल्याच्या पॅसेंजर गाड्या पूर्णा येथून धावत असतात. या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या लक्षणीय आहेत.
प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा नसते. अशा परिस्थितीत फेरीवाले ये-जा करतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे, अशा फेरीवाले व विक्रेत्यांवर रेल्वे पोलिसांच्या वतीने कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र असे होताना दिसून येत नाही. याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
तृतीयपंथ्यांची संख्या वाढली
या गाड्यांमधून भिकारी व तृतीयपंथी लोकांची संख्या वाढली असून सदरील लोक प्रवाशांना शारीरिक व मानसिक त्रास देण्याचे काम सतत करीत असतात. प्रवासी आपल्या गावाला जात असल्यामुळे तक्रार करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. या प्रकरणी रेल्वे विभागातील रेल्वे सुरक्षा बल व नागपूर रेल्वे पोलिस या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूर्णा जंक्शन या रेल्वेस्थानकाची व धावत्या प्रवासी गाडीतील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा व्यवस्था पुरावावी, अशी मागणी सामान्य प्रवासीवर्गातून होत आहे.