शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

पाऊल पढते पुढे! गुणवत्तापूर्ण, उपक्रमशील मराठी शाळांना प्राधान्य;६ हजार पोरांचा इंग्रजी शाळांना टाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 19:49 IST

भरमसाठ फी देऊनही योग्य सुविधा, वागणूक नाही. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना पसंती दिली.

औरंगाबाद -कोरोनाकाळात इंग्रजी शाळा सोडून जि. प. शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कोरोनापूर्वी २ लाख ४ हजार ७९७ विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत पटावर होते. ती संख्या कोरोनाकाळात वाढून २ लाख ११ हजार ४३० झाली. तब्बल सहा हजार ६३३ पालकांनी खाजगी शाळांतून विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेशित केले. एकीकडे पटसंख्या घटत असताना प्रवेशोत्सव, माझी शाळा सुंदर शाळा, आदर्श शाळा आदी उपक्रमांमुळे विद्यार्थी, पालकांना आकर्षित करण्यात उपक्रमशील शाळा यशस्वी झाल्या आहेत.

औरंगाबाद तालुक्यात जिल्हा परिषद सातारा, माउलीनगर, बजाज गेटसह विविध उपक्रमशील शाळांना पालकांची पसंती मिळत आहे. तसेच गंगापूर, पैठण, वैजापूरसह विविध तालुक्यांतील उपक्रमशील शाळांतील गुणवत्तपूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थी संख्या वाढत आहे. कोरोनाकाळात ६ हजार ६३३ विद्यार्थ्यांची वाढ झाल्याची माहिती शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली.

म्हणून सोडली इंग्रजी शाळाजिल्हा परिषदेच्या सातारा, बजाज गेट येथील शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले, भरमसाठ फी देऊनही योग्य सुविधा, वागणूक नाही. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना पसंती दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आकलनात आणि शिक्षणातही मोठा फरक जाणवत आहे. शिवाय या शाळा विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेचीही तयारी करून घेत आहेत.

गुणवत्तेचे शिक्षण उपलब्ध कोरोना कालावधीमध्ये पालकांची इंग्रजी माध्यमाच्या ऐवजी मराठी शाळांमध्ये मूळ गावात जाण्याची इच्छा निर्माण झाली ही वस्तुस्थिती आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये पोटतिडकीने विषय शिकवणारे शिक्षक, गुणवत्तेचे शिक्षण उपलब्ध असल्याने तसेच तेथे कोणत्याही स्वरूपाचा शुल्क भरण्याचा प्रश्न नसल्यामुळे पालक मुलांना जिल्हा परिषद शाळेमध्ये दाखल करण्यासाठी प्रवृत्त होत आहेत.-नीलेश गटणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद

असे वाढले विद्यार्थी : तालुका - वाढलेले विद्यार्थीऔरंगाबाद -१००८कन्नड -७३०खुलताबाद -४४७गंगापूर -१४०३पैठण - ८५१फुलंब्री -४०३वैजापूर -९२६सिल्लोड -७०९सोयगाव -१५६

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षणStudentविद्यार्थीmarathiमराठी