शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पार्किंगच्या वादातून छ. संभाजीनगरात पोलिसाने तरुणासह त्याच्या आईला भोसकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 11:29 IST

प्रत्यक्षदर्शींचा खळबळजनक दावा! स्थानिक पोलिसांसमक्ष कर्मचाऱ्याने वार केले; पुंडलिकनगरमध्ये पोलिसांविरुद्ध संताप.

छत्रपती संभाजीनगर : घरासमोर उभ्या वाहनांच्या वादातून पोलिसाने शेजारी तरुणासह त्याच्या आईला मारहाण करून धारदार चाकूने भोसकले. शुक्रवारी रात्री ११ वाजता गजानन महाराज मंदिर पुंडलिकनगर रस्त्यावर ही घटना घडली. यानंतर जमाव रस्त्यावर उतरल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

पोलिसांच्या वाहन विभागात कार्यरत कर्मचारी पुंडलिकनगर परिसरात वास्तव्यास आहे. गेल्या काहीदिवसांपासून संबंधित कर्मचाऱ्याचे तेथेच राहणाऱ्या विकास नरवडे यांच्यासोबत घरासमोर वाहने उभी करण्यावरून वाद सुरू होता. शुक्रवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास दोघे समोर आल्यानंतर त्यांच्यात जुना वाद उफाळून आला. पोलिसाने नरवडे यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करीत मारहाण केली. वाद वाढताच त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. 

थेट गळ्यावर वार, प्रकृती गंभीरनरवडे यांचे कुटुंब पोलिस कर्मचाऱ्याला आवरण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्याने धारदार चाकूने नरवडे यांच्या गळ्यावर वार केले. यात नरवडे रक्तबंबाळ झाल्याचे दिसताच त्यांच्या आईने धाव घेतली. पोलिसाच्या हल्ल्यात त्यादेखील जखमी झाल्या. भर रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे क्षणार्धात स्थानिकांची गर्दी झाली. जखमी नरवडे व त्यांच्या आईला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गळ्याला गंभीर दुखापत झाल्याने नरवडे यांची प्रकृती रात्री उशिरापर्यंत गंभीर असल्याचे त्यांच्या मित्रांनी सांगितले. 

पोलिसांसमोरच केला हल्लासदर पोलिस कर्मचारी व नरवडेमध्ये हाणामारी सुरू झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांसमक्ष कर्मचाऱ्याने विकास यांच्यावर हल्ला केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शीनी केला. जखमी विकास नरवडे राजकीय कार्यकर्ते आहेत. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनीच हल्लेखोराला पळवून लावल्याचा आरोप संतप्त जमावाने केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Argument over parking: Policeman stabs youth and mother in Sambhajinagar

Web Summary : A policeman in Sambhajinagar stabbed a young man and his mother following a dispute over parking. The incident escalated after a verbal argument turned physical, resulting in serious injuries. Tensions rose, requiring police intervention to manage the crowd.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर