शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एकाला हवी विजयाची हॅट्ट्रिक, तर दुसऱ्याला नको!

By admin | Updated: September 28, 2014 01:03 IST

औरंगाबाद : फुलंब्री मतदारसंघातही प्रमुख उमेदवारांचे राजकीय समीकरण बदलले आहे.

औरंगाबाद : सेना-भाजपा युती आणि काँग्रेस आघाडी तुटल्याने फुलंब्री मतदारसंघातही प्रमुख उमेदवारांचे राजकीय समीकरण बदलले आहे. आता जातीय समीकरणांना अधिक महत्त्व आले असून, विद्यमान आमदार डॉ. कल्याण काळे यांना तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅट्ट्रिक साधायची आहे. तर भाजपाचे उमेदवार आणि माजी मंत्री हरिभाऊ बागडे यांना पराभवाची हॅट्ट्रिक टाळायचीआहे.काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या फुलंब्री मतदारसंघात मागील दहा वर्षांपासून डॉ. कल्याण काळे निवडून येत आहेत. त्यापूर्वी भाजपाचे हरिभाऊ बागडे निवडून आले होते. २० वर्षांपूर्वी या मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे निवडून आले होते. मतदारसंघाचा इतिहास काँग्रेसच्या बाजूने असला तरी यंदा राजकीय समीकरणे बरीच विचित्र होऊन बसली आहेत. मतदारसंघात एकूण २ लाख ८१ हजार मतदार आहेत.मतदारसंघात मनसेचे भास्कर गाडेकर, सेनेचे राजेंद्र ठोबरे, राष्ट्रवादीच्या अनुराधा चव्हाण यांनीही उमेदवारी दाखल केली आहे. याशिवाय आणखी २५ उमेदवार सध्या निवडणूक रिंगणात आहेत. प्रमुख उमेदवारांमध्ये फुलंब्री तालुक्याचे तीन जण आहेत. त्यात गाडेकर, ठोंबरे आणि चव्हाण यांचा समावेशआहे.औरंगाबाद तालुक्यातील काळे आणि बागडे आहेत. मागील वेळी १६ हजार मते मिळविणारे सुहास शिरसाट भाजपामध्ये आल्याने हरिभाऊ बागडे थोडेसे समाधानी आहेत.एकीकडे विकासकामांचा पाढाच डॉ. कल्याण काळे वाचत आहेत. तर दुसरीकडे तालुक्यातील खराब रस्ते भाजपाने ‘कळी’चा मुद्दा बनविला आहे. उमेदवारांची संख्या वाढल्याने सध्या मतदारसंघात कार्यकर्त्यांची दिवाळी ‘जोरदार’होणार आहे, हे निश्चित आहे.मतदारसंघातील जाणकार मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार येथे १ लाख १७ हजार मराठा मतदार आहेत. ३२ हजार मुस्लिम, २७ हजार दलित बांधव, ११ हजार माळी, १२ हजार धनगर, ६ हजार वंजारी बांधव, ८ हजार राजपूत बांधव आहेत.मतदारसंघात एकूण ५० जाती आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस दलित आणि मुस्लिम बांधवांना कितपत आपल्याकडे वळवू शकते यावर बरीच काही गणिते अवलंबून आहेत.