शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
4
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
5
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
6
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
7
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
8
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
9
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
10
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
11
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
12
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
13
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
14
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
15
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
16
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
17
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
18
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
19
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
20
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
Daily Top 2Weekly Top 5

अनास्था! छत्रपती संभाजीनगर-नागपूर रेल्वे कनेक्टिव्हिटीच नाही, २४ तास ११४ ट्रॅव्हल्सचेच ‘राज’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 20:23 IST

छत्रपती संभाजीनगर-नागपूर मार्गावर प्रवाशांचे प्रचंड हाल; ट्रॅव्हल्ससाठी १८०० रुपयांपर्यंत मोजावे लागतेय तिकीट.

संतोष हिरेमठछत्रपती संभाजीनगर : नागपूर हे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आणि 'ऑरेंज सिटी' (संत्रा नगरी) म्हणून प्रसिद्ध असलेले विदर्भातील प्रमुख शहर आहे. तर, छत्रपती संभाजीनगर राज्याची पर्यटन राजधानी. परंतु, आजघडीला छत्रपती संभाजीनगरातून नागपूरसाठी एकही रेल्वे धावत नाही. त्याच वेळी शहरातून नागपूरसाठी एक, दोन नव्हे तर २४ तासांत ११४ ट्रॅव्हल्स धावतात. त्यातूनच नागपूरला जाण्यासाठी प्रवाशांना खिसा रिकामा करावा लागतो.

संभाजीनगर आणि नागपूर या दोन्ही महत्त्वाच्या शहरांदरम्यान दररोज शेकडो नागरिक प्रवास करतात. शिक्षण, रोजगार, आरोग्य सेवा आणि प्रशासकीय कामांसाठी नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. इतक्या महत्त्वाच्या मार्गावर आजघडीला एकही रेल्वे सेवा उपलब्ध नाही. बाब आश्चर्यकारक आणि चिंताजनक आहे. रेल्वेचा पर्याय नसल्याने प्रवाशांना पूर्णपणे खाजगी ट्रॅव्हल्सवर अवलंबून राहावे लागत आहे. सध्या संभाजीनगरातून नागपूरसाठी तब्बल २४ तासांत ११४ ट्रॅव्हल्स बस धावतात. थेट शहरातून आणि इतर शहरातून येऊन छत्रपती संभाजीनगरमार्गे धावणाऱ्या या ट्रॅव्हल्स आहेत. विशेष म्हणजे या सर्व ट्रॅव्हल्समध्ये बुकिंग होत असून, दिवस-रात्र या बसची ये-जा सुरू असते. शहरातील विविध भागांतून बस सुटताना दिसतात आणि प्रवाशांनी भरून धावतात. मात्र, या नागपूरसाठी एकही थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसणे ही संभाजीनगरासाठी गंभीर बाब ठरत आहे.

महागडा प्रवासनागपूरसाठी बसचे तिकीट दर साधारण ७०० ते १ हजार ८०० रुपयांदरम्यान आहेत. रेल्वेच्या तुलनेत हा खर्च अधिक असल्याने विद्यार्थ्यांसह नोकरदारांवर आर्थिक ताण वाढत आहे. नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी हा खर्च मोठा ठरत आहे.

३ रेल्वेंची कनेक्टिव्हीटी तोडलीनागपूरसाठी संभाजीनगरांसाठी धनबाद- कोल्हापूर दीक्षाभूमी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस अजनी एक्स्प्रेस महत्त्वपूर्ण ठरत होत्या. परंतु, कोराना काळात या रेल्वेंची कनेक्टिव्हीटी तोडण्यात आली. तर, नागपूर एक्स्प्रेसही आजघडीला बल्लारशाहपर्यंतच धावत आहे.

राजकीय अनास्थामुख्यतः मध्य आणि दक्षिण मध्य रेल्वे या विभागलेल्या महाराष्ट्रात, या झोनमधील समन्वयाचा अभाव, राजकीय अनास्थेमुळे रेल्वे कनेक्टिव्हीटी कमकुवत आहे. संभाजीनगर आणि उपराजधानी नागपूर स्वातंत्र्यानंतर अजूनही नियमित रेल्वे सेवेने जोडले गेलेले नाही. यावर लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र एका रेल्वे झोनअंतर्गत आणून राज्यांतर्गत रेल्वे कनेक्टिव्हीटी वाढवावीत, अशी मागणी आहे.-डॉ. स्वानंद सोळंके, मराठवाडा रेल्वे कृती समिती.

English
हिंदी सारांश
Web Title : Neglect! No Sambhajinagar-Nagpur train, 24-hour dominance of 114 travels.

Web Summary : Sambhajinagar lacks direct Nagpur rail connectivity; passengers rely on expensive private travels. 114 travel buses operate daily. Discontinued trains worsen the situation, highlighting political apathy. Demand for better rail links rises.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरrailwayरेल्वेhighwayमहामार्गtourismपर्यटन