शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणूक स्वबळावर लढावी; चिंतन बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 19:06 IST

पक्षातील कार्यकर्त्यांच्या या निवडणुका आहेत. त्यामुळे प्रत्येकाला उमेदवारीची अपेक्षा आहे.

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुका धोरणात्मक मुद्यांवर युती, आघाडी करून लढणे ठीक आहे. परंतु महापालिका व जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या निवडणुका ग्राऊंडवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या असतात. मागील पाच वर्षांपासून या निवडणुका झालेल्या नाहीत. आगामी काळात त्या होणे शक्य असून, त्या भाजपने स्वबळावर लढाव्यात, यावर प्रदेशाध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत चिंतन करण्यात आले. शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी युती नको, अशी भूमिकाही पदाधिकाऱ्यांनी मांडली.

जिल्ह्यासह राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर युतीला सर्व पक्षांचा आत्मविश्वास वाढला. त्यात महत्त्वाचे म्हणजे भाजपच्या राज्यात सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वबळावर लढण्याची दुर्दम्य इच्छा आहे. कारण पक्षात इच्छुकांची संख्या एवढी मोठी आहे, की एखाद्याला न्याय मिळाला नाही तर बंडखोरी होईल. थोड्याफार फरकाने अनेक जागा पडतील. परिणामी, पालिकेत सत्ता येण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. त्यामुळे असे काहीही प्रकार होऊ नयेत, यासाठी सरळ-सरळ स्वबळावर निवडणुकांना सामोरे गेल्यास पक्षातील अनेकांना उमेदवारीची संधी मिळेल, अशी भूमिका नेत्यांनी प्रदेश समितीकडे झालेल्या बैठकीत घेतली.

२०२० पासून निवडणुका नाहीत
२९ एप्रिल २०२९ साली पालिकेची मुदत संपली. तेव्हापासून आजवर मनपाच्या निवडणुका झालेल्या नाहीत. कोरोना संसर्गामुळे निवडणुका लांबल्या, त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समोर आला. प्रकरण कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. राज्यात झालेला राजकीय भूकंपाची निवडणुका लांबण्यात भर पडली. आता महायुतीला विधानसभेत मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याकडे भाजपसह सर्व पक्ष सरसावले आहेत.

आम्ही स्वबळावर लढण्याची मागणी केली
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची मागणी प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे. पक्षातील कार्यकर्त्यांच्या या निवडणुका आहेत. त्यामुळे प्रत्येकाला उमेदवारीची अपेक्षा आहे. मनपाच्या वॉर्डानुसार जेवढे प्रभाग होतील, त्या सर्व प्रभागांत भाजप उमेदवार देणार आहे. भाजपला १०० टक्के यश मिळण्याची खात्री असून, लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत पक्ष कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी शहरातील तिन्ही मतदारसंघांत प्रचंड मेहनत घेतल्यामुळेच तिन्ही जागांवर महायुतीचा विजय झाला आहे.
- शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष, भाजप

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024BJPभाजपाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMuncipal Corporationनगर पालिका