सकाळी परीक्षा; संध्याकाळी निकाल

By Admin | Updated: June 9, 2014 00:05 IST2014-06-08T23:19:47+5:302014-06-09T00:05:42+5:30

बीड: जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक, टंकलेखक या पदांसाठी रविवारी तीन केंद्रावर परीक्षा घेण्यात आल्या.

Morning exam; Evening result | सकाळी परीक्षा; संध्याकाळी निकाल

सकाळी परीक्षा; संध्याकाळी निकाल

बीड: जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक, टंकलेखक या पदांसाठी रविवारी तीन केंद्रावर परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षांचा निकालही सायंकाळी जाहीर करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक, टंकलेखक तसेच इतर पदांसाठी सध्या परीक्षा प्रक्रिया सुरू आहे. यातील पदांतील लिपिक, टंकलेखक पदांसाठी रविवारी ११ ते १ या वेळेत परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा शहरातील भगवान बाबा विद्यालय, गुरुकुल इंग्लिश स्कूल व चंपावती विद्यालय या केंद्रावर घेण्यात आली. परीक्षेसाठी १३२५ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. आज परीक्षा ९९९ विद्यार्थ्यांनी दिली. परीक्षेस तब्बल ३२६ जणांनी दांडी मारली.
परीक्षेसाठी दोन तास वेळ देण्यात आला होता. २०० गुणांची परीक्षा असून त्यामध्ये ८० प्रश्न विचारण्यात आले होते. प्रत्येक प्रश्नास अडीच गुण देण्यात आले होते.
दरम्यान, या परीक्षेचा निकाल सायंकाळी ७ वा. जाहीर करण्यात आला. परीक्षा सुरळीत व्हावी, यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. यामुळे रविवारी परीक्षा सुरळीत पार पडली. परीक्षेदरम्यान जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश पाठक, गळगुंडे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
१७ जागांसाठी १३२५ अर्ज
९९९ जणांनी दिली परीक्षा
३२६ जणांची दांडी

Web Title: Morning exam; Evening result