शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
4
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
5
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
6
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
7
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
8
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
9
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
10
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
11
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
12
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
13
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
14
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
15
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
16
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
17
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
18
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
19
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
20
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलसाठी घर सोडले, काम मिळेना, पैसे संपले; मुलाने स्वतःहून वडिलांना केला संपर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 16:43 IST

'मोबाइल नको, अभ्यास कर' वडिलांनी रागावल्याने अकरावीतील मुलाची पुण्यात धाव

छत्रपती संभाजीनगर: 'मोबाइलवर नको, अभ्यास कर' असे वडिलांनी रागावल्यामुळे एका १६ वर्षीय अकरावीत शिकणाऱ्या मुलाने शनिवारी (दि. १३) रात्रीतून थेट घर सोडल्याची धक्कादायक घटना सिडको भागात उघडकीस आली आहे. मुलगा रागाच्या भरात पुण्यात पोहोचल्याचे कळताच, कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आणि वडिलांनी तातडीने पुण्यात धाव घेत मुलाला परत आणले.

जालना जिल्ह्यातील हे कुटुंब सध्या आपल्या १६ वर्षांच्या मुलासह सिडको परिसरात वास्तव्यास आहे. शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास वडील कामावरून घरी आले. त्यावेळी त्यांचा अकरावीत शिकणारा मुलगा मोबाइल बघत बसलेला होता. वडिलांनी त्याला 'मोबाइल बघू नको, अभ्यास कर' असे सांगून दिवसभर कुठे गेला होता याबद्दल रागावले. वडिलांचे हे बोलणे मुलाने मनाला लावून घेतले. रात्री साडेबारापर्यंत मुलगा घरी झोपलेला होता, मात्र सकाळी साडेपाच वाजता पाहिले तेव्हा तो घरातून निघून गेला होता.

फोन आला, जीवात जीव आला
मुलगा घरात दिसला नाही, तेव्हा कुटुंबीयांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी सर्वत्र मुलाचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. अखेर वडिलांनी सिडको पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दिली आणि गुन्हा दाखल झाला. पैसे संपल्यानंतर मुलाने स्वतः वडिलांना फोन करून तो पुण्यात असल्याचे सांगितले. काम शोधण्यासाठी एका कंपनीत गेला होता, असे त्याने वडिलांना सांगितले. मुलगा पुणे येथे असल्याचे समजताच, चिंतेत असलेल्या वडिलांच्या जीवात जीव आला. त्यांनी तातडीने सिडको पोलिसांना माहिती दिली आणि मुलाला घेण्यासाठी पुण्याची वाट धरली.

English
हिंदी सारांश
Web Title : Scolded for Phone Use, Teen Flees Home, Reaches Pune

Web Summary : An Aurangabad teen ran away after being scolded for using his phone. He went to Pune seeking work, but called his father when his money ran out. The relieved father retrieved him with police help.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMobileमोबाइलCrime Newsगुन्हेगारी