रेल्वेस्थानकाची उभारणी पर्यटक नजरेसमोर ठेवून

By Admin | Updated: June 10, 2014 01:00 IST2014-06-10T00:50:29+5:302014-06-10T01:00:27+5:30

औरंगाबाद : औरंगाबाद रेल्वेस्थानकाचा मॉडेल रेल्वेस्थानकात समावेश केल्यानंतर पहिल्या टप्प्यात नवीन इमारतीचे काम झाले.

Keeping the sightseeing of the railway station in front of the tourist | रेल्वेस्थानकाची उभारणी पर्यटक नजरेसमोर ठेवून

रेल्वेस्थानकाची उभारणी पर्यटक नजरेसमोर ठेवून

औरंगाबाद : औरंगाबाद रेल्वेस्थानकाचा मॉडेल रेल्वेस्थानकात समावेश केल्यानंतर पहिल्या टप्प्यात नवीन इमारतीचे काम झाले. दुसऱ्या टप्प्यातील कामही आता लवकरच सुरू होणार असून, इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (आयटीडीसी) सहकार्याने हे काम केले जाणार आहे. अद्ययावत सोयी-सुविधांबरोबर पर्यटकांना केंद्रबिंदू मानून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रेल्वेस्थानकाची उभारणी केली जाणार आहे.
दक्षिण मध्य रेल्वे एडीआरएम पी.बी. निनावे यांनी सोमवारी रेल्वेस्थानकावरील कॅन्टीससह सोयी-सुविधांची पाहणी केली व विविध सूचना केल्या.
निनावे यांनी अधिकाऱ्यांकडून मॉडेल रेल्वेस्थानकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाचा आढावा घेतला.
असिस्टंट डिव्हिजन इंजिनिअर चंद्रमोहन यांनी दुसऱ्या टप्प्यातील इमारतीमधील विविध नियोजनाची माहिती दिली. दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी १४.५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
यामध्ये आयटीडीसी ५ कोटी रुपये आणि रेल्वे ९.५ कोटी रुपये खर्च करणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, येत्या सहा महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण करण्यास जवळपास तीन वर्षे लागतील. मॉडेल रेल्वेस्थानकाच्या पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे काम रखडले गेले आहे; परंतु आता लवकरच हे काम सुरू होणार आहे.
पर्यटक केंद्रबिंदू
मॉडेल रेल्वेस्थानकाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम करताना पर्यटकांना केंद्रबिंदू मानून नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व्हीआयपी रू म्सची सेवा दिली जाणार आहे. एक्सलेटर, लिफ्टची सुविधा देण्याचे नियोजन केले आहे.
फॉरेन एक्स्चेंज काऊंटर
दुसऱ्या टप्प्यात रेल्वेस्थानकावर फॉरिन एक्स्चेंज काऊंटर, विमान, बस तिकीट काऊंटर, टुरिझम इन्फर्मेशन काऊंटर, टॅक्सी काऊंटर, ‘मे आय हेल्प काऊंटर’ उभारण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.
आॅटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन
मॉडेल रेल्वेस्थानकाच्या पहिल्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या नवीन इमारतीत बुकिंग काऊंटर आहे. येत्या काही वर्षांत वाढणारी प्रवासी संख्या पाहता दुसऱ्या टप्प्यातही बुकिंग काऊंटरची सेवा देण्यात येणार आहे. यावेळी पी.बी. निनावे यांनी आॅटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन लावण्याबाबत नियोजन करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली.
दुसऱ्या टप्प्यातील इमारतीत सलून, मेडिकल, जनरल स्टोअर, बुक स्टोअर आइस्क्र ीम पार्लर आदी सुविधा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Web Title: Keeping the sightseeing of the railway station in front of the tourist