शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पौरोहित्य करणाऱ्या तरुणाने स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी; घरात नशेच्या गोळ्या अन् चिठ्ठी सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 12:39 IST

पौरोहित्य करणाऱ्या तरुणाच्या घरात ३३० नशेच्या गोळ्या आणि सुसाईड नोट; छत्रपती संभाजीनगरमधील खळबळजनक घटना

 

छत्रपती संभाजीनगर: शहरातील एन-६, साईनगर भागात एका ३१ वर्षीय तरुणाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली होती. दरम्यान, घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला. समीर नाईक असे या तरुणाचे नाव आहे. सिडको पोलिसांनी रविवारी समीरच्या घराची झाडाझडती घेतली असता, तिथे मोठ्या प्रमाणात नशेच्या गोळ्या आणि दारूच्या बाटल्यांचा साठा आढळून आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

प्राथमिक तपासानुसार, समीर हा गेल्या काही काळापासून नशेच्या आहारी गेला होता आणि त्याच तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घराच्या झडतीत धक्कादायक वास्तव समोर
सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी समीरच्या खोलीची तपासणी केली असता, तिथे ३३० भांगसदृश (नशेच्या) गोळ्या आणि सुमारे १५० ते २०० रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. समीर हा नेहमी उज्जैन परिसरात जात असे, तिथूनच त्याने हा साठा आणल्याचा संशय आहे. याशिवाय रक्ताच्या थारोळ्यात पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली आहे, ज्यात त्याने या कृत्यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे नमूद केले आहे.

पौरोहित्य करणारा तरुण 'गावठी कट्ट्या'पर्यंत कसा पोहोचला?
समीर हा आपल्या आई आणि भावासोबत भाड्याच्या घरात राहत असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पौरोहित्य आणि आईचे बांगड्यांचे दुकान सांभाळत असे. शनिवारी सायंकाळी आई दुकानात गेल्यानंतर त्याने स्वतःच्या उजव्या कानाजवळ गावठी पिस्तूल लावून गोळी झाडली. गोळी डोक्याच्या आरपार गेल्याने त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती. एका खाजगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्याला शासकीय रुग्णालय घाटी येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रविवारी मध्यरात्री उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, समीरने हे पिस्तूल नेमके कोठून आणि कोणाकडून मिळवले, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

धार्मिक ओढा आणि नशेचे जाळे
समीर हा महादेवाचा भक्त असून अनेकदा उज्जैनला जात असे. मात्र, एका बाजूला अध्यात्मिक ओढा आणि दुसऱ्या बाजूला नशेचे वाढते व्यसन यामुळे तो मानसिक तणावात असल्याची चर्चा परिसरात आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून डायरी आणि इतर कागदपत्रे जप्त केली असून, त्याच्या मोबाईल कॉल डिटेल्सवरून अधिक तपास केला जात आहे. या घटनेमुळे उच्चभ्रू वस्ती असलेल्या एन-६ भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Priest Shoots Himself: Drugs, Suicide Note Found in Home

Web Summary : A 31-year-old priest in Sambhajinagar attempted suicide by shooting himself. Police found drugs, alcohol, and a suicide note stating no one is responsible. He is in critical condition. Investigation underway to find the source of the weapon.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDrugsअमली पदार्थ