शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

सुट्टीचा आनंद दुःखात बदलला; पोहायला गेलेल्या वाळूजमधील ३ तरुणांचा टेंभापुरी प्रकल्पात अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 11:52 IST

सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या ९ मित्रांपैकी ३ जण गाळात अडकले; मृतांमध्ये परभणी व नांदेडच्या तरुणांचा समावेश.

गंगापूर (छत्रपती संभाजीनगर): महाराष्ट्र दिनानिमित्त असलेल्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी वाळूज औद्योगिक वसाहतीतून आलेल्या नऊ मित्रांच्या गटावर काळाने झडप घातली. टेंभापुरी मध्यम प्रकल्पात पोहण्यासाठी उतरलेल्या तीन तरुणांचा गाळात अडकून बुडून मृत्यू झाला. शैलेश जोगदंड (रा. परभणी), शैलेश हेलसकर (रा. नांदेड) आणि अविष्कार लोखंडे (रा. नांदेड) अशी मृतांची नावे आहेत.

नेमकी घटना काय?१ मे रोजी 'कामगार दिना'ची सुट्टी असल्याने वाळूजमध्ये राहणारे हे नऊ मित्र दुपारी दीडच्या सुमारास टेंभापुरी धरणावर आले होते. उन्हाचा तडाखा असल्याने तिघे जण पाण्यात पोहण्यासाठी उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने आणि जमिनीखालील खोल खड्ड्यांत साचलेल्या गाळात अडकल्याने ते बाहेर येऊ शकले नाहीत. इतर सहा मित्रांनी आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत तिघेही बुडाले होते.

अवैध उत्खननाचा 'मृत्यू-सापळा'ग्रामस्थांच्या मते, या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन झाल्यामुळे ठिकठिकाणी खोल खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांमध्ये गाळ साचला असून त्यात अडकून या तरुणांचा बळी गेला. अवघ्या पाच दिवसांपूर्वी, २६ एप्रिल रोजी याच ठिकाणी प्रिन्स श्रीसुंदर या १९ वर्षीय तरुणाचाही बुडून मृत्यू झाला होता. सलग होणाऱ्या या दुर्घटनांनंतरही प्रशासनाने कोणतीही सुरक्षात्मक पावले न उचलल्याने संताप व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Holiday joy turns tragic: Three youths drown in Tembhapuri project.

Web Summary : Three youths from Waluj drowned in Tembhapuri project while swimming. The victims, part of a group of nine friends, succumbed to the water's unpredictable depth and silt. Illegal excavation created dangerous pits, contributing to the tragedy, following a similar incident five days prior.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीdrowningपाण्यात बुडणे