शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

विविध उपक्रमांनी गुरूपौर्णिमा उत्सव

By admin | Updated: July 13, 2014 00:19 IST

उस्मानाबाद : व्यास जयंती म्हणजेच गुरू पौर्णिमा हा सण शनिवारी शहरासह जिल्हाभरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

उस्मानाबाद : व्यास जयंती म्हणजेच गुरू पौर्णिमा हा सण शनिवारी शहरासह जिल्हाभरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विविध शाळांत विद्यार्थ्यांनी गुरूंना पुष्प देऊन आशीर्वाद घेतले.उस्मानाबाद शहरातील स्वामी स्वामी समर्थ मंदिरात शनिवारी दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. येथे गुरू पौर्णिमेनिमित्त पारायण तसेच आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. पारायणात शहरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शिबिरासही चांगला प्रतिसाद मिळाला. रामानंद महाविद्यालयउस्मानाबाद : तालुक्यातील काजळा येथील श्री रामानंद महाराज विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात शनिवारी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक के. एस. राजगुरु, ओ. डी. कुंभार, आर. यू. कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन आहेर भूषण तर आभार प्रिया आदटराव हिने मानले. कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सनराईज प्रायमरी स्कूलउस्मानाबाद : शहरातील सनराईज प्रायमरी स्कूलमध्ये कार्यानुभव प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शिक्षणधिकारी ठाणे डॉ. गणपत मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी जगताप उपस्थित होते. यावेळी मुलांनी स्वत: बनविलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. कार्यक्रमासाठी शेख जेबा, शेख आरसा, शितल आकोसकर, अस्मिता शिंदे, स्वप्नाली घाडगे, पूजा गाडेकर, अर्चना राठोड, प्रवीण गाडेकर, संगीता घोडके आदींनी परिश्रम घेतले.महात्मा गांधी विद्यालयउस्मानाबाद : शहरातील महात्मा गांधी विद्यालयात मुख्याध्यापक सचिन लोंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कदम, अ‍ॅड. ए. एम. टेळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी समाधान ठाकर, अनुराधा गोरे, सोनाली रोहिदास आदींनी परिश्रम घेतले.समर्थ प्राथमिक आश्रमशाळाउस्मानाबाद : तालुक्यातील येवती येथील श्री समर्थ प्राथमिक आश्रमशाळेत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग पुरी होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. प्रमोद देवकर यांची उपस्थिती होती. यावेळी सौरभ साळुंके, राजकन्या माळी, सचिन रूपनर, वैष्णवी माने, स्वाती भोसले, अस्मिता हुबाले, रोहीत देवकर आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी मदन गुरव, महेश पिंपरकर, श्रीनिवास शेळके आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रशांत गिरी यांनी केले. तर आभार महादेवी हुबाले हिने मानले.राणी तारा राजा प्रशालाभूम : शहरातील राणी ताराराजा कन्या प्रशालेत विद्यार्थी मंत्रिमंडळाने गुरुजींचे गुलाब पुष्प देऊन आशीर्वाद घेतले. यात विद्यार्थी प्रतिनिधी प्रीती स्वामी यांच्यासह इतर विद्यार्थीही सहभागी झाले होते. यावेळी शिक्षिका वीर, मुख्याध्यापक संतोष अघाव यांनी गुरूपौर्णिमेचे महत्त्व विद्यार्र्थ्यांंना सांगितले. (वार्ताहर)तेरमध्ये पादुका पूजनतेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे गुरुपौर्णिनिमित्त श्रीराम मंदिरामध्ये श्रीगुरु पादुका पूजन व पद्मनाथ महाराज व्यास यांचे प्रवचन झाले. महाप्रसाद वाटप करुन कार्यक्रमाची सांगता झाली. तसेच धनगर समाजाच्या वतीने तेर येथे गुरुपौर्णिनिमित्त बिरुदेव यांची पूजा करण्यात आली. त्यानंतर गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील नागरिकांची उपस्थिती होती.त्रिविक्रम मंदीरामध्ये आषाढी पोर्णिनिमित्त काल्याचा कार्यक्रम घेण्यात आला. ह. भ.प. प्रल्हाद महाराज सुरवशे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला.