शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
3
Top Marathi News LIVE Updates: रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्ती'ला मुदतवाढ?, १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता
4
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
5
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
6
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
7
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
9
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
10
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
11
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
12
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
14
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
15
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
16
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
17
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
18
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
19
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
20
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मूर्ती बनविण्याची कला ठरली शिक्षणासाठी आधार !

By admin | Updated: August 4, 2014 00:50 IST

तामलवाडी : बालवयात अवगत झालेली कला तिचा वापर शिक्षणाच्या खर्चाकरिता होत आहे.

तामलवाडी : बालवयात अवगत झालेली कला तिचा वापर शिक्षणाच्या खर्चाकरिता होत आहे. गणपती मूर्ती तयार करुन तिची विक्री करणे व मिळालेल्या नफ्यातून तिघा बहिण-भावंडाचा शिक्षणाचा खर्च भागवला जातो. तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (खुर्द) गावातील १३ वर्षाचा परवेज नावाचा मुलगा गणपतीच्या मूर्त्या तयार करीत आहे.पिंपळा गावात बापू शेख हे पत्नी व तीन मुलांसह राहतात. कोरडवाहू पाच एकर जमिनीवर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागविणार. यासाठी वडील बापू याने खासगी कंपनीत काम धरले आणि वयाच्या ११ व्या वर्षाच्या परवेज याने बालवयात अवगत झालेली कला अंमलात आणली. गावात कुंभाराने विक्री आणलेल्या गणपती मूर्तीचे निरीक्षण बारकाईने करुन सलग २ वर्ष हाताने गणेश मूर्ती बनविल्या. गतवर्षी ५२० मूर्ती बनवून त्याची विक्री गावात केली. सलग दोन वर्षापासून परवेज शेख मूर्ती बनविण्याचे काम करीत आहे. गणेशोत्सवाचे वेध लागण्याअगोदर दीड महिना मूर्ती बनविण्याचे काम हाती घेतो. दिवसभर शाळा, गुरुजींनी सांगितलेला अभ्यास, नंतर मुर्त्या बनविण्याचे काम करतो. दोन वर्षापासून मूर्ती विक्रीतून मिळालेल्या नफ्यातून परवेज स्वत:सह बहिण आफ्रीन, रेश्मा या तिघांचा शिक्षणाचा वार्षिक खर्च भागवितो. बहिण आफ्रीन ही तामलवाडी येथील सरस्वती विद्यालयात १० वीत शिक्षण घेत आहे. तर परवेज व रेश्मा हे दोघे गावातील प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहे. आई नौशाद ही मोलमजुरीसाठी कामाला जाते. यंदा बापू शेख याने परवेजला मूर्ती तयार करण्यासाठी लोखंडी साचा आणला आहे. यासाठीचा कच्चामाल सोलापूरहून आणला जातो. वर्षभरातील दीड महिना परवेज हा मूर्ती बनविण्यासाठी कष्ट घेतो. या मुर्तींना परिसरातील गावागावातून मागणी असल्याचे परवेज शेख याने नमूद केले. (वार्ताहर)मूर्ती शहरातील बाजारात आणणारसलग महिनाभर तयार केलेल्या गणेश मूर्त्यांना रंगकाम करुन उत्सवापूर्वी या मूर्त्या तुळजापूर, सोलापूर शहरातील बाजारात नेणार आहे. गतवर्षी एका मूर्तीस ४० रुपये भाव मिळाला होता, असे परवेज याने सांगितले.