शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गायकवाड यांनी स्वीकारला कुलसचिवपदाचा प्रभार

By admin | Updated: January 7, 2015 01:05 IST

औरंगाबाद : मंगळवारी सकाळी डॉ. धनराज माने यांनी कुलसचिवपदाची सूत्रे डॉ. सुरेश गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करून ते येथून कार्यमुक्त झाले.

औरंगाबाद : मंगळवारी सकाळी डॉ. धनराज माने यांनी कुलसचिवपदाची सूत्रे डॉ. सुरेश गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करून ते येथून कार्यमुक्त झाले. दुपारी ४ वा. पुणे येथे पोहोचल्यानंतर डॉ. माने यांनी राज्याच्या उच्च शिक्षण संचालकपदाची सूत्रे स्वीकारली. सोमवार दुपारनंतर विद्यापीठात अत्यंत वेगाने घडामोडी घडल्या. डॉ. धनराज माने यांची उच्च शिक्षण संचालकपदी निवड झाली होती. काल त्यांना संचालकपदी तात्काळ रुजू होण्याचे आदेश प्राप्त झाले; पण कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे हे ३ जानेवारीपासून मुंबईत आहेत. ते इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले असल्यामुळे मावळते कुलसचिव डॉ. माने यांची अडचण झाली होती. त्यांनी मोबाईलवरून कुलगुरूंना संपर्क साधला व मंगळवारी कार्यमुक्त होत असून, कुलसचिवपदाची सूत्रे कोणाकडे द्यावी, याबाबत सल्लामसलत केली. त्यानंतर कुलगुरू डॉ. चोपडे यांनी व्यवस्थापन परिषदेच्या सर्व सदस्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला व प्रभारी कुलसचिवपदी सक्षम व्यक्तीची वर्णी लावण्याबाबत चर्चा केली. तेव्हा विद्यमान परीक्षा नियंत्रक कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांच्याकडे कुलसचिवपदाचा प्रभार देण्याचा चर्चेअंती निर्णय घेण्यात आला.आज सकाळी डॉ. माने यांनी कॅप्टन गायकवाड यांना संपर्क साधून कार्यालयात बोलावून घेतले व त्यांच्याकडे कुलसचिवपदाची सूत्रे देऊन ते येथून कार्यमुक्त झाले. डॉ. माने यांनी उपस्थित कर्मचारी- अधिकारी व प्राध्यापकांचा निरोप घेत ते पुण्याकडे रवाना झाले.