जेवणाच्या बहाण्याने हॉटेलमध्ये नेऊन मैत्रिणीला पाजले बळजबरीने मद्य अन् केला अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 20:15 IST2026-05-09T20:15:04+5:302026-05-09T20:15:45+5:30

मुकुंदवाडीतील हॉटेलमध्ये ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार; ओळखीच्याच व्यक्तीने केला विश्वासघात, आरोपी अटकेत

Friendship is tarnished! girl was taken to a hotel on the pretext of dinner, forced to drink alcohol and tortured | जेवणाच्या बहाण्याने हॉटेलमध्ये नेऊन मैत्रिणीला पाजले बळजबरीने मद्य अन् केला अत्याचार

जेवणाच्या बहाण्याने हॉटेलमध्ये नेऊन मैत्रिणीला पाजले बळजबरीने मद्य अन् केला अत्याचार

छत्रपती संभाजीनगर : जेवायला जाण्याच्या बहाण्याने मैत्रिणीला हॉटेलमध्ये नेऊन तेथे तिला बळजबरी मद्य पाजून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना ७ मे रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी परिसरातील एका हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात आरोपी कपिल ज्ञानेश्वर पाटेकर (रा. जय टॉवर, उस्मानपुरा) याच्याविरूद्ध गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्याला अटक केली.

पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार आणि आरोपी हे परस्परांच्या चांगल्या ओळखीचे आहेत. ७ मे रोजी आरोपी जीप घेऊन मुकुंदवाडीत आला. तेथे त्याने पीडितेला कॉल करून बोलावून घेतले. यानंतर जेवण करायला जायचे असे सांगून तो तिला जीपमध्ये बसवून एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेथे त्याने तिला बळजबरीने मद्य पाजले. यानंतर पीडितेला त्रास होऊ लागल्यानंतर तो तिला हॉटेलच्या रूममध्ये घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर बळजबरी केली. यानंतर त्याने तिला परत मुकुंदवाडी भाजीमंडी येथे आणून सोडले. या प्रकारानंतर संतप्त पीडितेने आरोपीविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली.

Web Title : खाने के बहाने होटल में महिला को नशीला पदार्थ देकर बलात्कार

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में, एक महिला को 7 मई को खाने के बहाने होटल में नशीला पदार्थ देकर बलात्कार किया गया। पीड़िता की शिकायत पर आरोपी कपिल पाटेकर को गिरफ्तार किया गया।

Web Title : Woman drugged, raped in hotel under pretext of dinner.

Web Summary : In Chhatrapati Sambhajinagar, a woman was allegedly drugged and raped at a hotel on May 7th. The accused, Kapil Patekarm, has been arrested following the victim's police complaint.