Shubman Gill IPL Record : गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल याने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात दमदार खेळी केली. या सामन्यात तो IPL मध्ये आपल्या खात्यात आणखी एक शतकी खेळीची नोंद करेल, असे वाटत असताना एक अतरंगी फटका खेळताना ८४ धावांवर तो झेलबाद झाला. त्याचे शतक हुकले, पण या खेळीसह त्याने मोठ्या विक्रमाला गवसणी घालताना किंग कोहलीला मागे टाकले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गिलनं एका डावात मोडला एबीसह डेविड वॉर्नरचा रेकॉर्ड
जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात गिलने यंदाच्या हंगामात ४०० धावांचा पल्लाही गाठला. या कामगिरीसह त्याने विराट कोहलीसारख्या दिग्गजाला मागे टाकत नवा विक्रम प्रस्थापित केला. २०२० पासून प्रत्येक हंगामात शुभमन गिलनं ४०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. सलग सात हंगामात ४०० पेक्षा अधिक धावा करताना त्याने एबी डिव्हिलियर्स आणि डेविड वॉर्नर यांचा विक्रम मोडीत काढला. या दोन दिग्गजांनी सलग सहा हंगामात ४०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
KL राहुलचा विक्रमवीर अवतार! स्टायलिश बॅटरचा IPL मधील ‘हा’ रेकॉर्ड मोडणं जवळपास अशक्य
रैना अन् शिखर धवनची बरोबरी
आयपीएलमध्ये गिलच्या आधी आयपीएल स्पेशलिस्ट सुरेश रैना याने २००८ ते २०११ हंगामात सलग सात हंगामात ४०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे. याशिवाय शिखर धवन याने २०१६ ते २०२२ या कालावधीत ही कामगिरी करून दाखवली आहे. एकंदरीत विचार केला तर आयपीएलमधील १८ हंगामात विराट कोहलीनं ११ वेळा ४०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
गिल-साई सुदर्शन जोडीचा आणखी एक विक्रम
राजस्थान विरुद्धच्या सामन्यात शुभमन गिलनं साई सुदर्शनच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली. साईसोबत सहाव्यांदा पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचताना त्याने विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसी जोडीचा विक्रम मोडला. या दोघांनी आरसीबीसाठी ५ शतके झळकवल्याचा रेकॉर्ड आहे.