शहरं
Join us  
Trending Stories
1
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
2
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
3
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
4
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
5
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
8
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
9
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
10
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
11
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
12
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
13
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
16
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
17
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
18
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
20
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
Daily Top 2Weekly Top 5

साडेचारशे लाभार्थीं टीनपत्रापासून वंचित

By admin | Updated: June 13, 2014 00:31 IST

विलास चव्हाण , परभणी समाजकल्याण विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या विशेष फंडातून मागासवर्गीयांना शंभर टक्के अनुदानावर टीनपत्राचे वाटप करण्यात येते़

विलास चव्हाण , परभणी
समाजकल्याण विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या विशेष फंडातून मागासवर्गीयांना शंभर टक्के अनुदानावर टीनपत्राचे वाटप करण्यात येते़ परंतु, दोन वर्षांपासून साडेचारशे लाभार्थ्यांना टीनपत्राचे वाटपच करण्यात आले नाही़ यामुळे लाभार्थीं लाभापासून वंचित राहिले आहेत.
जिल्हा परिषद विभागाच्या वतीने शासनाकडून विविध विकास उपयोगी योजना राबविल्या जातात़ परंतु, या योजना तळागाळापर्यंत्त पोहचत नसल्याने खरा लाभार्थीं योजनेपासून वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे़
या योजना कागदोपत्रीच राबविल्या जातात की काय असा सवाल लाभार्थ्यांना पडला आहे़ जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने विशेष फंडातून मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी शंभर टक्के अनुदानावर ७ टीनपत्रे देण्यात येतात़ परंतु, ४१५ मागावसर्गींय लाभार्थ्यांसाठी २ हजार ९०५ टीनपत्रे गोदामात येऊन पडली आहेत़ परंतु जि़ प़ सदस्य व अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या टीनपत्राचे लाभार्थ्यांना वाटपच झाले झाले नाही़ यामुळे जिल्ह्यातील लाभार्थीं लाभापासून वंचित आहेत़ याचे सोयरसूतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे़ याकडे जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
पदाधिकाऱ्यांत उदासिनता
मागासवर्गीय लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी टिनपत्रे गोदामातून येऊन पडली आहेत़ परंतु, टिनपत्रे कोणाला द्यायचे कारणावरुन समितीत एक वाक्यता न झाल्याने जिल्ह्यातील ४१५ लाभार्थीं अद्यापही लाभापासून वंचित आहेत़ त्यामुळे लाभार्थ्यातून नाराजी व्यक्त होत आहे़
लाभार्थ्यांसाठी टीनपत्रे घेऊन ठेवण्यात आली आहेत. ही टीनपत्रे तालुक्यातील गोदामध्ये धूळखात पडली आहेत.
तालुकानिहाय लाभार्थ्यांची संख्या
परभणी७५
जिंतूर७९
पाथरी३३
पालम३७
सोनपेठ२५
सेलू४१
मानवत२९
गंगाखेड५०
पूर्णा४६
एकूण४१५
पावसाळ्यापूर्वीच टीनपत्रे देणे गरजेचे
मागासवर्गीयांना १०० टक्के अनुदानावर टीनपत्रे वाटप केले जातात. मात्र टीनपत्रे पावसाळ्यापूर्वी दिली असती तर याचा लाभ झाला असता. कारण पावसाळ्यामध्ये लाभार्थ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निकाली निघाला असता. परंतु, टीनपत्रे वाटप न केल्याने या लाभार्थ्यांचा संसार उघड्यावरच राहणार आहे. याकडे समितीतील सदस्यांनी व अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे.