शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी मालमत्तांवरही डोळा

By admin | Updated: November 28, 2014 01:17 IST

औरंगाबाद : महापालिकेने २०० कोटी रुपयांच्या कर्जासाठी अब्जावधी किमतीच्या मालमत्ता आयडीबीआय बँकेकडे गहाण ठेवल्या आहेत.

औरंगाबाद : महापालिकेने २०० कोटी रुपयांच्या कर्जासाठी अब्जावधी किमतीच्या मालमत्ता आयडीबीआय बँकेकडे गहाण ठेवल्या आहेत. त्या मालमत्तांची किंमत कमी असल्यामुळे बँकेकडे आणखी १३ मालमत्ता गहाण ठेवण्याचा निर्णय मनपाने घेतला असून, त्यामध्ये काही खाजगी मालमत्ताही गहाण ठेवण्यात येत असल्याचा आक्षेप नागरिक नोंदविण्यास पुढे आले आहेत.मनपाने आक्षेपांसाठी ७ दिवसांची मुदत दिली असून, आज दिवसभरात बँकेकडे अनेकांनी आक्षेप नोंदविण्याबाबत सर्वांशी चर्चा केली. नाथ सुपर मार्केट गहाण ठेवणे इतके मनपाला सोपे नाही. कारण ती जागा पालिकेने भाडे करारावर दिलेली आहे. तसेच शहरातील काही मोकळे भूखंडही मनपाने गहाण ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यापैकी क्रांतीचौक येथील सर्व्हे नं. ५४ मधील जागेवर नागरिकांची घरे आहेत. ती जागाही मनपाने बँकेकडे गहाण ठेवण्याबाबत प्रगटन देऊन आक्षेप मागविले आहेत. सर्व्हे नं. ५४ क्रांतीचौक येथील ८५०९.३४ चौ.मी. जागेप्रकरणी अनेक कोर्टप्रकरणे झालेली आहेत. त्यानंतरही जागेच्या मालकीचा वाद अजून मिटलेला नाही. ती पूर्ण ९ एकर जागा आहे. तेथे २४ घरे असून ती जागा मनपा गहाण ठेवण्याच्या तयारीत आहे. पालिकेच्या या झोपेत धोंडा घालण्याच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, ते बँकेकडे आक्षेप नोंदविणार आहेत. जागा गहाण ठेवण्याची माहिती बाहेर येताच पहिला आक्षेप समोर आला आहे. ती जागा कुणाच्या मालकीची आहे, याबाबत मनपाने मालमत्ता विभागाशी संपर्क केला असता संबंधित अधिकाऱ्याने माहिती घ्यावी लागेल, असे उत्तर दिले. काय आहे जागेचे प्रकरण?क्रांतीचौक येथील सर्व्हे नं. ५४ मधील ९ एकर जागा निजामाने १९३७ ते १९४७ या काळात विकली. प्रतापनगरपर्यंतच्या जागेचा त्यामध्ये समावेश होता. मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यानंतर ही जागा महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात गेली. १९५४ चे खासरापत्र आणि १९६० मधील सातबाऱ्यावर जागेच्या मालकीप्रकरणी स्पष्ट उल्लेख आहे. १९६६ साली नगरपालिकेची स्थापना झाली. मनपाकडे जागेचे पीआरकार्ड नाही. त्यामुळे मनपा त्या जागेची मालक होऊ शकत नाही. या प्रकरणी नागरिकांनी तालुका भूमिअभिलेख, जिल्हाधिकाऱ्यांकडे बाजू मांडली. असे असताना मनपा जर ती जागा गहाण ठेवण्याचा प्रयत्न करीत असेल, तर न्यायालयाचा अवमान होऊ शकतो, असे विपीन गुजरानी यांनी सांगितले.