शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वातावरण स्वाईन फ्लूसाठी पोषक

By admin | Updated: March 1, 2015 00:09 IST

औरंगाबाद : शनिवारी सकाळपासून वातावरणात बदल झाला. ढगाळ वातावरणासोबत तापमानही घटले. हे वातावरण स्वाईन फ्लूच्या विषाणूसाठी पोषक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे

औरंगाबाद : शनिवारी सकाळपासून वातावरणात बदल झाला. ढगाळ वातावरणासोबत तापमानही घटले. हे वातावरण स्वाईन फ्लूच्या विषाणूसाठी पोषक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे जोपर्यंत थंड वातावरण आहे, तोपर्यंत स्वाईन फ्लूची साथ अधिक बळावण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वाईन फ्लू होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. दरम्यान, आज घाटीतील स्वाईन फ्लू वॉर्डात १२ रुग्णांवर उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती घाटी प्रशासनाकडून देण्यात आली.नववर्षात स्वाईन फ्लू साथीचा उद्रेक झाला. आता ही साथ अधिक भयंकर रूप धारण करीत असल्याचे दिसून येते. स्वाईन फ्लूने शहरात आतापर्यंत सात जणांचे बळी गेले आहेत. ज्येष्ठ पत्रकार रमेश राऊत यांचा उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. एन१,एच१ या विषाणूपासून स्वाईन फ्लू होतो. थंड वातावरण या विषाणूसाठी पोषक आहे. त्यामुळे शक्यतो वातानुकूलित यंत्रणा असलेल्या एखाद्या मोठ्या कार्यालयात स्वाईन फ्लू अधिक पसरण्याचा धोका असतो. हिवाळ्यातही स्वाईन फ्लूचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळतात. दुपारनंतर शहराचे तापमान १६.०४ अंशापर्यंत घसरले. थंड वातावरण स्वाईन फ्लूच्या विषाणूकरिता पोषक असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असा सल्ला घाटीतील मेडिसीन विभागातील सहयोगी प्रा. डॉ. जिरवणकर यांनी दिला. ते म्हणाले की, स्वाईन फ्लूपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकांना एन-९५ हा मास्क वापरणे शक्य नाही. त्यामुळे निदान प्रत्येकाने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच घराबाहेर पडताना नाका, तोंडाला दोन किंवा तीन घडीचा रुमाल बांधावा.