शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
4
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
5
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
6
मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम 
7
Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
8
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
9
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
10
Central Railway: आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; टार्गेट आणि वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
11
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
12
अधिक मास २०२६: संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे 'हे' निवडक अध्याय वाचणेदेखील ठरेल प्रभावी!
13
सिद्धार्थ जाधवच्या पत्नीला पाहिलंत का? बिजनेसवुमन आहे तृप्ती, करते 'हे' काम
14
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
15
राजकारणापासून दूर..; प्रतीक यादव काय काम करायचे? किती होती त्यांची संपत्ती? जाणून घ्या...
16
किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
18
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
19
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
20
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
Daily Top 2Weekly Top 5

‘खचून जाऊ नका, शिवसेना तुमच्या पाठीशी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:09 IST

लोकशाहीत विजय आणि पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पराभवाने अजिबात खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागा, असा सल्ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी चंद्रकांत खैरे यांना ‘मातोश्री’वर दिला. साडेचार हजार मतांनी निसटता पराभव कसा झाला, याची अत्यंत बारकाईने त्यांनी माहिती घेतली. लवकरच औरंगाबादेत मेळावा घेणार असल्याची घोषणाही ठाकरे यांनी केली.

ठळक मुद्देउद्धव ठाकरे : ‘मातोश्री’वर खैरे यांची भेट


औरंगाबाद : लोकशाहीत विजय आणि पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पराभवाने अजिबात खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागा, असा सल्ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी चंद्रकांत खैरे यांना ‘मातोश्री’वर दिला. साडेचार हजार मतांनी निसटता पराभव कसा झाला, याची अत्यंत बारकाईने त्यांनी माहिती घेतली. लवकरच औरंगाबादेत मेळावा घेणार असल्याची घोषणाही ठाकरे यांनी केली.
गुरुवारी सायंकाळीच खैरे यांच्या पराभवाची वार्ता मातोश्रीवर पोहोचली होती. त्यानंतर ताबडतोब उद्याच म्हणजे शुक्रवारी भेटीसाठी मातोश्रीवर या, असा निरोप चंद्रकांत खैरे यांना मिळाला होता. चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, माजी महापौर विकास जैन आज दुपारी १.३० वाजता मातोश्रीवर पोहोचले. प्रारंभी, उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पराभवाची कारणे समजून घेतली. पराभव जिव्हारी न लावता पुन्हा एकदा जोमाने कामाला लागा, असे सांगितले. पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले. पक्षबांधणीसाठी लवकरच औरंगाबादेत विभागीय मेळावा घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
भाजपची भूमिकाही समजून घेतली
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी खैरे यांच्या विरोधात शड्डू ठोकल्याने खैरे यांना पराभवास सामोरे जावे लागले. जालन्यात दानवे यांनी अर्जुन खोतकर यांच्या मनधरणीसाठी उद्धव ठाकरे यांना मध्यस्थी करायला लावली होती. एकीकडे स्वत: निवडून येण्यासाठी सेनेची मदत घेतली. दुसरीकडे जावयाला सेना उमेदवाराच्या विरोधात उभे केले. भाजपचे हे राजकारणही उद्धव ठाकरे यांनी समजून घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
लवकरच पक्षात फेरबदल
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे औरंगाबाद शहरावर विशेष प्रेम होते. १९८८ पासून २०१९ पर्यंत खैरे यांनी कधीच पराभव बघितला नव्हता. खैरे यांना पहिल्यांदाच पराभवास सामोरे जावे लागले. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच संघटनेतही मोठ्या प्रमाणात फेरबदल करणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले. पक्षातील मरगळ दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारणLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल