शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

 औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत ६५० पाण्याच्या टाक्यांचे वितरण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 23:51 IST

टंचाईवर मात करण्यासाठी वेगवेगळे उपाय करण्यात येत असून, सीएसआर (कॉर्पाेरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी)अंतर्गत विभागातील औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात साठवण टाक्यांचे वितरण करण्यात येणार आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. ११७६ गावे आणि ३७६ वाड्यांमध्ये १५३९ टँकरने पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. टंचाईवर मात करण्यासाठी वेगवेगळे उपाय करण्यात येत असून, सीएसआर (कॉर्पाेरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी)अंतर्गत विभागातील औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात साठवण टाक्यांचे वितरण करण्यात येणार आहे. साठवण टाक्यांतून पिण्याचे पाणी वितरित करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला मंत्रालयातून देण्यात आल्या आहेत.

मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांसह नाशिक, अहमदनगर आणि बुलडाणा या जिल्ह्यांत १००० टाक्यांचे वितरण होणार आहे. सीएसआरअंतर्गत टंचाईग्रस्त गावांमध्ये प्लास्टिक/फायबरच्या पाणी साठवण टाक्यांमध्ये टँकरचे पाणी टाकण्यात येईल. साठवण टाकी ऊंच कठड्यावर बसविण्यात येईल. प्रत्येक टाकीसाठी २ ते ५ नळ जोडण्या करण्याबाबत शासनाने प्रशासनाला काही सूचना केल्या आहेत. महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा या कंपनीने सीएसआरअंतर्गत १ हजार साठवण टाक्या पुरविण्याचे मान्य केले आहे. सदरील टाक्या तहसीलदार पातळीवर आवश्यक त्या ठिकाणी बसविण्यात येणार आहेत. औरंगाबादेतील एका कंपनीकडून सदरील टाक्या पुरविल्या जातील, असे शासनाने आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :droughtदुष्काळAurangabadऔरंगाबाद