शहरं
Join us  
Trending Stories
1
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
2
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
3
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
4
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
5
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
8
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
9
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
10
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
11
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
12
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
13
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
16
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
17
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
18
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
20
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या विरोधातील कारवाई थांबविण्याची मागणी

By admin | Updated: June 13, 2014 00:31 IST

परभणी: मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनी पोलिस बळाचा वापर करुन विद्यापीठ प्रशासन ताब्यात घेत आहे.

परभणी: मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनी पोलिस बळाचा वापर करुन विद्यापीठ प्रशासन ताब्यात घेत आहे. ही कारवाई थांबवावी, अन्यथा शेतकरी संघटना राज्यभर आंदोलन उभारेल, असा इशारा कुलगुरुंना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने कुलगुरुंना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, शेंद्रा, बलसा, सायाळा येथील शेतकऱ्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर पोलिस बळाचा वापर करुन आम्हाला बाहेर काढण्याचे प्रयत्न होत आहेत. २०-२५ वर्षांपासून विद्यापीठाने या जमिनी पडित ठेवल्या आहेत. ज्या उद्दिष्टासाठी विद्यापीठाने शेतकऱ्यांकडून नाममात्र मावेजा देऊन ताब्यात घेतल्या होत्या ते उद्दिष्ट जमिनी पडित ठेवून संपुष्टात आले आहे. कायद्याप्रमाणे विद्यापीठाने या जमिनी मूळ मालकाला परत करायला हव्यात. परंतु, त्याऐवजी शेतकऱ्यांना जमिनीतून बाहेर काढले जात आहे. विद्यापीठाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात २३८० हेक्टर जमीन अतिरिक्त असल्याचेच म्हणजेच ही जमीन उपयोगी नसल्याचे म्हटले आहे आणि त्या अतिरिक्त जमिनीपैकीच या जमिनी शेतकऱ्यांच्या ताब्यात आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी विद्यापीठाचे संपादित केल्या. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना विद्यापीठ किंवा इतरत्र सरकारी सेवेत सामावून घेणे कायद्याने बंधनकारक होते. परंतु, शेतकरी कुटुंबियांना या लाभापासूनही वंचित ठेवण्यात आले आहे. विद्यापीठाकडून शेतकऱ्यांना परस्पर न्याय मिळण्याची शक्यता दुरावल्यामुळे शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या विरोधात न्यायालयात प्रकरण दाखल केले आहे आणि न्यायालयानेही शेतकऱ्यांचे ताबे मान्य केले आहेत. या उपरही होत असलेली ही कारवाई अन्यायकारक असून ती थांबावावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर उच्चाधिकार समिती सदस्य गोविंद जोशी, जिल्हाध्यक्ष भगवान शिंदे, रामभाऊ शिंदे, मदन शिंदे, भास्कर खटींग, अनंत पवार, रंगनाथ चोपडे, उद्धव जवंजाळ, गोपाळ लोंढे, किशोर ढगे आदींची नावे आहेत.(प्रतिनिधी)