CoronaVirus : औरंगाबादमध्ये कोरोनाचे दीड शतक पूर्ण; आणखी ७ पॉझिटिव्हसह रुग्णसंख्या १५१ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 14:34 IST2020-04-30T14:33:51+5:302020-04-30T14:34:24+5:30

शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढतच जात असून नवीन हॉटस्पॉटसुद्धा पुढे येत आहेत.

CoronaVirus: Corona completes 150 patients in Aurangabad; total 151 patients with 7 more positives | CoronaVirus : औरंगाबादमध्ये कोरोनाचे दीड शतक पूर्ण; आणखी ७ पॉझिटिव्हसह रुग्णसंख्या १५१ वर

CoronaVirus : औरंगाबादमध्ये कोरोनाचे दीड शतक पूर्ण; आणखी ७ पॉझिटिव्हसह रुग्णसंख्या १५१ वर

औरंगाबाद : औरंगाबादेत गुरुवारी दुपारी आणखी ७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५१ झाली, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले. या ७ जणांत ४ जण किल्लेअर्क , २ जण नूर कॉलनी आणि एक भीमनगर येथील असल्याची माहितीही डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढतच जात असून नवीन हॉटस्पॉटसुद्धा पुढे येत आहेत. प्रशासनाने तात्काळ हालचाली करत पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांना क्वारंटाईन करून तपासणी सुरू केली आहे. गुरुवारी सकाळी १४ जणांना कोरोनाची बाधा झाली आणि बाधितांचा आकडा १४४ वर गेला. यात जय भीमनगर येथील ६, किलेअर्क १, आसिफिया कॉलनी २ , नूर कॉलनी १, कैलास नगर १, चिकलठाणा १, सावरकर नगर १ जिल्हा रुग्णालय, घाटी मधील १ अशा १४ जणांचा समावेश होता. तर दुपारी प्राप्त माहिती नुसार ७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून रुग्णसंख्या १५१ वर गेली आहे.  या ७ जणांत ४ जण किल्लेअर्क , २ जण नूर कॉलनी आणि एक भीमनगर येथील असल्याची माहितीही डॉ. येळीकर यांनी दिली.

Web Title: CoronaVirus: Corona completes 150 patients in Aurangabad; total 151 patients with 7 more positives