CoronaVirus : औरंगाबादकरांना मोठा धक्का; एकाच दिवसात तब्बल ४७ पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या १७७ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 20:08 IST2020-04-30T20:07:19+5:302020-04-30T20:08:02+5:30

नवीन ठिकाणे पुढे आल्याने चिंता वाढली

CoronaVirus: Big shock to Aurangabadkars; In one day, 47 positive, total 177 patients | CoronaVirus : औरंगाबादकरांना मोठा धक्का; एकाच दिवसात तब्बल ४७ पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या १७७ वर

CoronaVirus : औरंगाबादकरांना मोठा धक्का; एकाच दिवसात तब्बल ४७ पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या १७७ वर

ठळक मुद्देदुपारपर्यंत गाठला होता १५१ चा आकडा

औरंगाबाद : शहरात गुरुवारी एकाच दिवसात तब्बल ४७ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामुळे रुग्णांची संख्या १७७ वर गेली असून नव्या ठिकाणांची भर पडल्याने शहरवासीयांना मोठा धक्का बसला आहे. 

गुरुवारी सकाळी १४ आणि दुपारी ७ रुग्ण पॉझिटिव्ह आढल्याने रुग्णासंख्येने दीड शतक पूर्ण केले होते. रुग्ण संख्या वाढीची हीच गती वाढत जात संध्याकाळी तब्बल २७ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे दिवभरात ४७ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णसंख्या १७७ वर गेली आहे. २७ नव्या रुग्णात संजयनगर-मुकुंदवाडी १८, खडकेश्वर १, एमआयटी बिडबायपास १, रोहिदास नगर- मुकुंदवाडी २, नारेगाव- अजीज कॉलनी २, रोशन गेट- १, नूर कॉलनी १ अशी रुग्णसंख्या व ठिकाणे असल्याची माहिती डॉ. कानन येळीकर यांनी दिली आहे. दरम्यान, आज समोर आलेल्या रुग्णांमुळे नव्या ठिकाणांची भर पडल्याली आहे. यामुळे शहरवासीयांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढतच जात असून नवीन हॉटस्पॉटसुद्धा पुढे येत आहेत. प्रशासनाने तात्काळ हालचाली करत पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांना क्वारंटाईन करून तपासणी सुरू केली आहे. गुरुवारी सकाळी १४ जणांना कोरोनाची बाधा झाली आणि बाधितांचा आकडा १४४ वर गेला. यात जय भीमनगर येथील ६, किलेअर्क १, आसिफिया कॉलनी २ , नूर कॉलनी १, कैलास नगर १, चिकलठाणा १, सावरकर नगर १ जिल्हा रुग्णालय, घाटी मधील १ अशा १४ जणांचा समावेश होता. तर दुपारी  ७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून रुग्णसंख्या १५१ वर गेली.  या ७ जणांत ४ जण किल्लेअर्क , २ जण नूर कॉलनी आणि एक भीमनगर येथील रुग्ण आहे. 

Web Title: CoronaVirus: Big shock to Aurangabadkars; In one day, 47 positive, total 177 patients