शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबतर्फे स्पर्धा

By admin | Updated: July 10, 2016 01:06 IST

औरंगाबाद : बालमित्रांनो कॅम्पस क्लब सदस्यता नोंदणीला धमाकेदार सुरुवात झालेली आहे. तुमच्या शाळेतल्या, कॉलनीतल्या अनेक मित्रांनी कॅम्पस क्लबसाठी सदस्यता नोंदणी केली आहे.

औरंगाबाद : बालमित्रांनो कॅम्पस क्लब सदस्यता नोंदणीला धमाकेदार सुरुवात झालेली आहे. तुमच्या शाळेतल्या, कॉलनीतल्या अनेक मित्रांनी कॅम्पस क्लबसाठी सदस्यता नोंदणी केली आहे. तुम्ही केली की नाही? अजूनही जर तुम्ही कॅम्पस क्लबचे सदस्य झाले नसाल, तर त्वरा करा. कारण आता शेवटचेच काही दिवस बाकी आहेत. लवकरच कॅम्पस क्लब सदस्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. लोकमत भवन आणि शहरातील विविध शाळांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसेच ‘कॅम्पस क्लब स्पोर्टस् फेस्टिव्हल अंतर्गत’ विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशभक्तीपर गीत स्पर्धा आणि हस्ताक्षर स्पर्धाही खास तुमच्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. या सर्व स्पर्धा विविध वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत; पण मित्रांनो या सर्व स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी तुम्ही कॅम्पस क्लबचे सदस्य असणे अनिवार्य आहे. लहान दोस्तांच्या सर्वांगीण विकासासाठी लोकमत टाइम्स ‘कॅम्पस क्लब’ हे हक्काचे व्यासपीठ उभे केलेले आहे. कॅम्पस क्लबसाठीचे सदस्यता नोंदणी शुल्क १५० रुपये असून सदस्य होताच तुम्हाला २०० रु. किमतीची ‘इन्सुलेटेड माय कॅन (वॉटर बॉटल) भेट स्वरूपात मिळेल. याशिवाय ९९९ रु. कि मतीचे गिफ्ट कूपन्स वाढदिवसानिमित्त विविध दुकानांमध्ये भेटवस्तूंच्या स्वरूपात मिळतील. लकी ड्रॉद्वारे भरपूर बक्षिसेही तुम्ही जिंकू शकता. याशिवाय दर्जेदार कार्यक्रम आणि विविध स्पर्धा जोडीला आहेतच. तेव्हा लवकरात लवकर नावनोंदणी करून या सर्व गोष्टींचा लाभ घ्या. यासाठी रिगल लॉन, लोकमत भवन येथे स. १० ते सायं. ५ यावेळेत नावनोंदणी करता येईल. तसेच शहरातील विविध सेंटर्सवर नावनोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी ७०३८०३६७७८, ९९२१०३०७०० या क्रमांकांवर संपर्क साधावा.