शहरं
Join us  
Trending Stories
1
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
2
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
3
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
4
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
5
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
8
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
9
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
10
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
11
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
12
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
13
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
16
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
17
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
18
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
20
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
Daily Top 2Weekly Top 5

जिंतूरमध्ये पुन्हा बोर्डीकरविरुद्ध भांबळे ?

By admin | Updated: June 12, 2014 00:13 IST

शिवसेनेचा उमेदवार अजूनही गुलदस्त्यात: अपक्षांचीही गर्दी असणार

विजय चोरडिया ल्ल जिंतूर
जिंतूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आ. रामप्रसाद बोर्डीकर निवडणूक रिंगणात उतरणार हे निश्चित असले तरी ते पक्षातर्फे निवडणूक लढवितात की अपक्ष,अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे. यावेळी शिवसेनेच्या गोटात उमेदवारीविषयी शांतता आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे राष्ट्रवादीचे विजय भांबळे हे काय खेळी खेळतात, याकडेही लक्ष लागले आहे.
गेल्या दोन विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेसचे रामप्रसाद बोर्डीकर यांना या मतदारसंघात संघर्ष करावा लागत आहे. २००४ साली त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली तरी गेल्या निवडणुकीत मात्र काँगे्रसचे उमेदवार म्हणून लढताना शेवटपर्यंत विजयासाठी संघर्ष करावा लागला आणि अवघ्या १२२५ मतांनी ते विजयी झाले. अपक्ष म्हणून विजय भांबळे यांनी त्यांना जोरदार लढत दिली होती. २००४ मध्येही विजय भांबळे हे बसपाच्या तिकिटावर रिंगणात उतरले होते. परंतु, पराभव झाला. गेल्यावेळेस अपक्ष म्हणून ते विजयाच्या समीप पोहोचले होते. परंतु, नशिबाने बोर्डीकरांना साथ दिली. यावेळीही विजय भांबळे हे पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरण्याची चिन्हे असून त्या दृष्टीने त्यांची जोरात तयारी चालू असल्याची चर्चा आहे.
या मतदारसंघातील माजी आमदार कुंडलिक नागरे यांच्या नावाचीही चर्चा असली तरी ते परभणीतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. बोर्डीकर हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार अशी चर्चा त्यांच्याच गोटातून कार्यकर्ते करीत आहेत. परंतु, अधिकृत दुजोरा मिळाला नाही. जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर काँग्रेसचे दावेदार म्हणून कुंडलिक नागरे हे पर्याय ठरु शकतात. परंतु, नागरे यांची इच्छा सध्यातरी जिंतूर लढविण्याची नाही, अशी चर्चा आहे.
गेल्या निवडणुकीत माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी शिवसेनेकडून ही निवडणूक लढविली होती. गेल्या काही दिवसांच्या त्यांच्या हालचाली पाहता त्यांचा प्रयत्न पाथरीेमधून रिंगणात उतरण्याचा आहे. असे झाले तर या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार कोण, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
या मतदारसंघात जिंतूर आणि सेलू तालुक्याचा समावेश आहे. सेलूचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे हे ही काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. मध्यंतरी त्यांचे बंधू मुकेश बोराडे यांचे नाव चर्चेत होते. दोघांपैकी एक जण रिंगणात उतरेल, असा कयास आहे. जिंतूरचे माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांनीही निवडणूक लढविण्याची तयारी गेल्या एक वर्षापासून केली आहे. त्यांचा पक्ष कोणता हे आजतरी निश्चित नाही. या मतदारसंघात बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आयरामप्रसाद बोर्डीकर७६४२७
अपक्ष विजय भांबळे७५२०२
शिवसेनाहरिभाऊ लहाने३०५७६
इच्छुकांचे नाव पक्ष
रामप्रसाद बोर्डीकर काँग्रेस
विजय भांबळेराष्ट्रवादी
कुंडलिक नागरेकाँग्रेस
प्रताप देशमुख----
विनोद बोराडेकाँग्रेस
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय जाधव यांना ४८५ एवढे मताधिक्य