शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
5
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
6
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
7
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
8
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
9
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
10
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
12
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
13
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
14
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
15
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
16
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
17
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
18
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
19
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
20
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंग; लेणीला धोका, इतिहासप्रेमींकडून संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 19:32 IST

बुद्ध लेणी परिसरात भूखंडासाठी काहीजण जेसीबी, पोकलेनच्या मदतीने टेकड्या फोडण्याचे काम करत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंग करण्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी समोर आला. या प्रकारामुळे या ऐतिहासिक लेणीला धोका निर्माण होत असल्याने इतिहासप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे.

बुद्ध लेणी परिसरात भूखंडासाठी काहीजण जेसीबी, पोकलेनच्या मदतीने टेकड्या फोडण्याचे काम करत आहेत. हे काम साध्या खोदकामाच्या मर्यादेत न राहता थेट स्फोटके वापरून केले जात आहे. गुरुवारी दुपारी अडीच- तीनच्या सुमारास जोरदार आवाजांनी हा संपूर्ण परिसर हादरला. या प्रकाराची काहींनी थेट भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. ब्लास्टिंगचा थेट परिणाम लेणीवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यातून लेणीतील शिल्पांना आणि त्यांच्या संरचनेस हानी पोहोचण्याची भीती अभ्यासक, पर्यावरणप्रेमी आणि पुरातत्त्वप्रेमींनी व्यक्त केली.

या भागात कोणत्याही प्रकारच्या विकासकामांसाठी पुरातत्त्व, जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक असते. सध्या सुरू असलेल्या कामांना अधिकृत मंजुरी मिळाली आहे का, याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. याप्रकरणी तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहे.

दोन जोरदार ब्लास्ट
दुपारी २ ते ३ वाजेच्या दरम्यान दोन जोरदार ब्लास्ट झाले. हे बुद्ध लेणीपासून २०० ते ३०० मीटरच्या आतच झाल्याची स्थिती आहे. हा प्रकार लेणीसाठी धोकादायक ठरू शकतो. याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली पाहिजे.
- भीमराव हत्तीअंबिरे, संस्थापक अध्यक्ष, संबोधी अकादमी

पाहणी करू : पुरातत्त्व सर्वेक्षण
लेणीपासून ३०० मीटरच्या आत असेल, तर आम्हाला कारवाई करता येईल. जेसीबीच्या मदतीने रेनवाॅटर हार्वेस्टिंगसाठी खोदकाम सुरू असून, ते ३०० मीटरच्या बाहेर असल्याचे समजते. परिसराची पाहणी करून खात्री केली जाईल, असे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

परवानगी नाही
बुद्ध लेणी परिसरात होणाऱ्या ब्लास्टिंगसाठी माझ्या कार्यकाळात तरी परवानगी देण्यात आलेली नाही.
- अनिल घनसावंत, गौण खनिज अधिकारी

लेणीला धोकाच
हनुमान टेकडी ते बुद्धलेणी दरम्यानचा भाग पूर्वी ग्रीन झोन होता. तेथे साधा खड्डाही खोदता येत नव्हता परंतु आता या भागाला ‘यलो झोन’ म्हणून अंतिम मान्यता मिळण्याआधीच खोदकाम, ब्लास्टिंगचा प्रकार सुरू आहे. त्यातून लेण्यांला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे हा प्रकार थांबविण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
- डाॅ. संजय पाईकराव, सचिव, मूर्ती व शिल्प संशोधन संस्था

...तर पुन्हा दुरुस्ती अशक्य
लेणी स्थापत्य हा आपला वारसा ठेवा आहे. लेणी परिसरात स्फोटकांचा वापर केल्यास लेण्यांला भेगा पडणे, लेण्यांतील खांब कोसळणे, दरडी कोसळणे, असा धोका होऊ शकतो. असे काही झाले तर त्याची आपण पुन्हा दुरुस्तीही करू शकणार नाही. त्यामुळे डोळ्यात तेल घालून काळजी घेतली पाहिजे.
- श्रीकांत उमरीकर, संयोजक, मराठवाडा प्राचीन वास्तू संवर्धन समिती.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad caveऔरंगाबाद लेणी