तोडफोडीनंतर बसफेऱ्या रोखल्या

By Admin | Updated: June 9, 2014 00:05 IST2014-06-08T23:18:49+5:302014-06-09T00:05:37+5:30

बीड: फेसबुकवर महापुरुषाची विटंबना केल्याचे पडसाद येथे रविवारी उमटले़

Avoid buses after the storm | तोडफोडीनंतर बसफेऱ्या रोखल्या

तोडफोडीनंतर बसफेऱ्या रोखल्या

बीड: फेसबुकवर महापुरुषाची विटंबना केल्याचे पडसाद येथे रविवारी उमटले़ एका बसची संतप्त कार्यकर्त्यांनी तोडफोड केली़ त्यानंतर बसफेऱ्या तासभर थांबविण्यात आल्या़ बस थांबविल्याने प्रवाशांना ताटकळत बसावे लागले़
रविवारी दुपारी बार्शी रोडवर औरंगाबाद-लातूर ही बस फोडली़ यामध्ये बसच्या समोरील व मागील काचांचा भुगा झाला़ एकूण २५ हजारांचे नुकसान झाले़ यात एक प्रवासी जखमी झाला़ शहरातील तणावपूर्ण वातावरण पाहून विभागीय नियंत्रक पी़बी़नाईक, आगारप्रमुख ए़ यू़पठाण यांनी बस रोखून ठेवल्या़ त्यामुळे भरउन्हात प्रवाशांना ताटकळत थांबावे लागले़ अनेकांना पाण्यासाठी हॉटेल, टपऱ्यांचा आधार घ्यावा लागला.
स्थानकात तोबा गर्दी
दुपारच्यावेळी अचानक बसवर दगडफेक होत असल्याने बीड बसस्थानकातून बाहेर जाणाऱ्या बसगाड्या थांबविल्या़ त्यामुळे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती़ त्याुमळे जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले़ काही प्रवाशी बसमध्ये, काही स्थानकात तर काही सैराभर फिरताना दिसून आले़ (प्रतिनिधी)

Web Title: Avoid buses after the storm