संख्याबळाचे गणित अन् भाजप स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ शिवसेनेकडून खेचण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 19:57 IST2026-05-19T19:56:51+5:302026-05-19T19:57:49+5:30

उमेदवाराच्या नावावर मे अखेरीस शिक्कामोर्तब

Aurangabad-Jalna MLC Election Announced: BJP Stakes Claim with 250 Members Against Eknath Shinde's Shiv Sena. | संख्याबळाचे गणित अन् भाजप स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ शिवसेनेकडून खेचण्याच्या तयारीत

संख्याबळाचे गणित अन् भाजप स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ शिवसेनेकडून खेचण्याच्या तयारीत

- विकास राऊत
छत्रपती संभाजीनगर :
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल सोमवारी वाजला असून, सदस्य संख्येच्या बळावर भाजप हा मतदारसंघ स्वत:कडे खेचण्याच्या तयारीला लागला आहे. मे अखेरपर्यंत उमेदवारीचा निर्णय पक्ष घेणार असल्याचे भाजप सूत्रांनी सांगितले. दोन्ही जिल्ह्यात भाजपचे २५० नगरसेवक आहेत, तर शिंदेसेनेकडे १२५ च्या आसपास नगरसेवक आहेत. त्यामुळे महायुतीत भाजप यावेळी वरचढ दिसतो आहे.

या मतदारसंघात २०१९ साली युती व आघाडीमध्ये थेट लढत झाली होती. भाजपची सदस्यसंख्या जास्त असताना देखील तत्कालीन अखंड शिवसेनेला मतदारसंघ सोडण्यात आला व शिवसेनेने अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीनंतर चार महिन्यांनीच शिवसेना-भाजपचा काडीमोड झाला होता. त्यामुळे यावेळी हा मतदारसंघ पारंपरिकरीत्या शिंदेसेना स्वत:कडे ठेवते की भाजप संख्याबळाच्या जोरावर मतदारसंघ खेचणार याकडे लक्ष आहे. दोन जिल्ह्यातील ६५७ मतदार या निवडणुकीसाठी असतील. यात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत सदस्यांचा समावेश आहे. प्रशासनाने पात्र मतदारांच्या माहितीचे संकलन सुरू केले आहे. जालना जिल्हा परिषदेची निवडणूक अद्याप झालेली नाही. त्यामुळे ५४ सदस्य वगळून जालना मनपाचे वाढीव तीन नगरसेवक मिळून ६०६ मतदार निवडणुकीत मतदार असतील. विजयासाठी एकूण मतदानाच्या ५० टक्के मते अधिक १ असे सूत्र असते. २०१९ ते २०२५ या काळात आ. अंबादास दानवे यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात : ३८५ मतदार असतील.
जालना जिल्ह्यात : २७५ पैकी २२१ मतदार असतील.

२०१९ चे पक्षीय बलाबल असे होते.....
पक्ष .......... मतदार

भाजप .......... १८९
शिवसेना ....... १४१
काँग्रेस ........ १७०
राष्ट्रवादी काँग्रेस ... ०८०
एमआयएम ... ०२८
अपक्ष ......... ०४९
एकूण ..... ६५७

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पक्षबल असे...
छत्रपती संभाजीनगर मनपात भाजपचे ५७ सदस्य आहेत. एमआयएमचे ३३, शिंदेसेनेचे १३, उद्धवसेना ६, वंचित बहुजन आघाडी ४, तर राष्ट्रवादी (श. प.) १ व काँग्रेसचा १ असे ११५ सदस्य आहेत.
जिल्हा परिषदेत भाजपचे २४, शिंदेसेेनेचे २२, उद्धवसेना ९, राष्ट्रवादी (अजित पवार) ४, राष्ट्रवादी (शरद पवार) १, प्रहार १, अपक्ष २ मिळून ६३ सदस्य आहेत.
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये भाजपचे ४२, शिंदेसेनेचे ५०, उद्धवसेनेचे २, राष्ट्रवादी (अ. प.)चे ३७, तर काँग्रेसचे १८ दोन अपक्ष सदस्य आहेत.

हा मतदारसंघ भाजपच लढेल...
छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर भाजपची सदस्य संख्या वाढली आहे. मतदारसंघात आमचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपच लढेल.
-अतुल सावे, ओबीसी कल्याण मंत्री.

Web Title : भाजपा की नजर शिवसेना की स्थानीय निकाय सीट पर, संख्याबल का गणित

Web Summary : भाजपा औरंगाबाद-जालना स्थानीय निकाय सीट पर शिवसेना (शिंदे गुट) से ज्यादा पार्षदों की संख्या के बल पर कब्ज़ा करना चाहती है। पार्टी जल्द ही उम्मीदवार तय करेगी और 657 मतदाताओं वाले आगामी चुनाव में संख्यात्मक लाभ पर ध्यान केंद्रित करेगी।

Web Title : BJP Eyes Shiv Sena's Local Body Seat with Numerical Strength

Web Summary : BJP aims to win the Aurangabad-Jalna local body seat, leveraging its larger number of corporators compared to the Shinde Sena. The party plans to finalize its candidate soon, focusing on its numerical advantage in the upcoming election with 657 voters.