शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

टेस्टिंगनंतर छत्रपती संभाजीनगरात १ मे रोजी पाणी येईल असे वाटले होते...पण तसे घडले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 17:32 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (मजीप्रा) काही अधिकारी आणि जीव्हीपीआर कंपनी यांच्यात छोट्या-छोट्या गोष्टींवरून बेबनाव सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १४ एप्रिल रोजी जायकवाडीचे पाणी नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणले. जलवाहिनीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर मागील पंधरा दिवस किरकोळ कामे करण्यात घालविल्यामुळे शहरात पाणी येऊ शकले नाही. नक्षत्रवाडी ते जायकवाडी या उलट दिशेने जलवाहिनीची स्वच्छतासुद्धा झालेली नाही. गुरुवारी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तीन तास बैठक घेण्यात आली. बैठकीत रखडलेल्या निधीवरच चर्चा करण्यात आली.

शहराला १ मे रोजी पाणी द्यावे असे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, शुक्रवारी (दि.१ मे) शहरात पाणी आले नाही. ‘लोकमत’ने यासंदर्भात सविस्तर माहिती घेतली असता काही धक्कादायक बाबी समोर आल्या.

मजीप्रा आणि जीव्हीपीआरदरम्यान चाललंय काय?महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (मजीप्रा) काही अधिकारी आणि जीव्हीपीआर कंपनी यांच्यात छोट्या-छोट्या गोष्टींवरून बेबनाव सुरू आहे. त्याचा फटका शहरातील १८ लाख नागरिकांना बसतो आहे. १४ एप्रिल रोजी जलवाहिनीची यशस्वीरीत्या टेस्टिंग घेतली. त्यानंतर पाणी उलट दिशेने म्हणजे नक्षत्रवाडी ते जायकवाडीकडे प्रेशरने नेऊन जलवाहिनी पूर्ण स्वच्छ करणे अपेक्षित होते. मागील पंधरा दिवसांत हे काम झालेच नाही. स्कोअर व्हॉल्व्हचे नटबोल्ट टाइट करणे, नवीन बसविणे, एअर व्हॉल्व्ह बसविणे आदी कामे करण्यात येत होती. पुढील दोन ते तीन दिवसांत जलवाहिनी स्वच्छ करण्याचे काम सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाणी आले असते तर...नवीन जलवाहिनीद्वारे किमान ६० ते ७० एमएलडी अतिरिक्त पाणी नक्षत्रवाडीत आणले तर ते शुद्ध करून शहराला वापरता येऊ शकते. नागरिकांना किमान तीन ते चार दिवसाआड पाणी मिळू शकले असते. ४२-४३ अंश तापमानामुळे शहरात पाण्याची मागणी प्रचंड वाढली आहे. नागरिक पाण्यासाठी तहानलेले आहेत. मात्र, याचे गांभीर्य मजीप्राला नाही.

बिले थांबवली, मंजुरीच नाही...महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव श्री. रंगनायक गुरुवारी शहरात दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी पाणीपुरवठ्याची आढावा बैठक घेतली. बैठकीत जीव्हीपीआर कंपनीने केलेल्या कामांना मजीप्रा अधिकाऱ्यांनी मंजुरीच दिलेली नाही. मागील काही महिन्यांपासून ८२ कोटी रुपयांची बिले थांबवून ठेवली आहेत. कोणती कामे केली त्यावर मुद्देनिहाय चर्चा करण्यात आली. बैठकीस पोलिस आयुक्त प्रणीव पवार, पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड यांच्यासह मनपा, मजीप्रा अधिकारी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Water supply delayed in Chhatrapati Sambhajinagar despite testing success.

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar's water supply, expected May 1st, delayed due to disputes, incomplete pipeline cleaning, and pending bill approvals between authorities and GVPR. Citizens face acute water scarcity.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणीMunicipal Corporationनगर पालिका