पत्नीनेच दिली शिक्षकाच्या हत्येची सुपारी; तपासात खळबळजनक खुलासा समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 13:50 IST2026-05-05T13:49:57+5:302026-05-05T13:50:46+5:30

Chandrapur : तालुक्यातील घोडपेठ परिसरात शिक्षकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याच्या प्रकरणाचा भद्रावती पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उलगडा केला असून, पत्नीनेच पतीच्या हत्येसाठी एक लाख रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात समोर आले आहे.

Wife gave the order for teacher's murder; Sensational revelations in investigation | पत्नीनेच दिली शिक्षकाच्या हत्येची सुपारी; तपासात खळबळजनक खुलासा समोर

Wife gave the order for teacher's murder; Sensational revelations in investigation

लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती (चंद्रपूर) :
तालुक्यातील घोडपेठ परिसरात शिक्षकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याच्या प्रकरणाचा भद्रावती पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उलगडा केला असून, पत्नीनेच पतीच्या हत्येसाठी एक लाख रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात समोर आले आहे. या धक्कादायक प्रकरणी पत्नीसहित चार जणांना अटक करण्यात आली आहे.

मृत रवींद्र तुळशीराम कुळमेथे (वय ४६, रा. मुधोली चेक नं. ०२, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) हे गडचिरोली येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. आरोपींमध्ये पत्नी दीपमाला कुळमेथे (वय ४२, रा. कृषीनगर, वरोरा), कथित समाजसेविका वर्षा राजू परचाके (वय ४७, रा. मानेवाडा, नागपूर), सोनू ऊर्फ प्रवीण नरेंद्र काळोकार (वय ३१, रा. दाहोडा, ता. रामटेक) आणि नजीर नसरूल अन्सारी (वय २८, रा. कळमेश्वर फाटा, नागपूर) यांचा समावेश आहे.

कौटुंबिक वादातून कटाची निर्मिती

पोलिस तपासानुसार, पती-पत्नीमध्ये मागील काही वर्षांपासून सातत्याने वाद सुरू होते. वारंवार होणारा छळ व मारहाणीमुळे दीपमाला त्रस्त होती. अलीकडेच झालेल्या मारहाणीत तिच्या कानाला गंभीर दुखापत झाली होती. त्यासाठी नागपूर येथे शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

नोकरी व पेन्शनच्या लालसेतून सुपारी

दरम्यान, दीपमालाच्या संपर्कात वर्षा परचाके आली. त्यानंतर पतीचा काटा काढल्यास त्याची नोकरी व पेन्शनचा लाभ मिळू शकतो, या हेतूने हत्या करण्याचा कट रचण्यात आला. यासाठी दोन आरोपींना एक लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा आरोप आहे.

कारमध्येच गळा आवळून हत्या

१ मे २०२६ रोजी आरोपींनी रवींद्र कुळमेथे यांना वरोरा येथून कारमध्ये बसवून घोडपेठ येथील निर्मनुष्य ठिकाणी नेले. तेथे कारमध्येच गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह घटनास्थळी टाकून आरोपी फरार झाले.

कारवाईत यांचा सहभाग

ठाणेदार योगेश्वर पारधी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात वीरेंद्र केदारे, संजय मिश्रा, प्रियांका गेडाम, पो. स्टे. भद्रावती शोध पथकातील महेंद्र बेसरकर, अनुप आस्टूनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, धर्मराज मुंडे, योगेश घाटोळे, संतोष राठोर, प्रेमकुमार बावनकर, रोहित चिटगिरे, करिश्मा जुनघरी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे बलराम झाडोकर, सर्वेश बेलसरे, संतोष निबोरकर, नितीन कुरेकार, नितीन साळवे, प्रमोद कोटनाके, किशोर वैरागडे, अमोल सावे, गोपी नरोटे, शेखर मातनकर, दिनेश अराडे, ऋषभ वरकिगे यांनी ही कारवाई पार पाडली.

तांत्रिक तपासातून गुन्ह्याचा उलगडा

मोबाइल लोकेशन, संशयास्पद हालचाली आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला. दीपमाला व वर्षा परचाके यांना वरोरा येथून, तर उर्वरित दोन्ही आरोपींना नागपूर येथून अटक करण्यात आली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली कार (एमएच. ३१-डीसी. ८९१९) तसेच तीन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०३ (२), १४० (२) व ६१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title : पत्नी ने शिक्षक पति की हत्या की सुपारी दी; चौंकाने वाला खुलासा।

Web Summary : चंद्रपुर में, एक शिक्षक की हत्या उसकी पत्नी ने ₹1 लाख में सुपारी देकर करवाई। पत्नी और तीन अन्य गिरफ्तार। घरेलू विवाद और पेंशन के लालच ने अपराध को प्रेरित किया। आरोपियों ने कार में गला घोंटकर हत्या की।

Web Title : Wife hires killers to murder teacher husband; shocking details emerge.

Web Summary : In Chandrapur, a teacher's murder was orchestrated by his wife, who paid a hit squad ₹1 lakh. The wife and three others have been arrested. Domestic disputes and the lure of pension benefits motivated the crime. The suspects strangled the victim in a car.