शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या आहारात निघाले सोंडे

By admin | Updated: May 3, 2015 01:35 IST

कोरपना तालुक्यातील आदर्श शाळा म्हणून सर्वत्र ओळख असलेल्या बिबी येथील जिल्हा परिषद शाळेत बुधवारी विद्यार्थ्यांना..

नांदाफाटा : कोरपना तालुक्यातील आदर्श शाळा म्हणून सर्वत्र ओळख असलेल्या बिबी येथील जिल्हा परिषद शाळेत बुधवारी विद्यार्थ्यांना आहार म्हणून चक्क सोंडे लागलेल्या हरभऱ्याची उसळ देण्यात आली. शालेय पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना सकाळी उसळ दिल्यानंतर उसळीची दुर्गंधी येऊ लागली. विद्यार्थ्यांनी उसळ खाताच चव बदलेली वाटल्याने विद्यार्थ्यांनी उसळ खाणे बंद केले.दरम्यान, घडलेल्या प्रकाराची वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली. शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी हा प्रकार पाहिला. एका भांड्यात ठेऊन असलेली उसळ काळ्या रंगाची, अर्धवट शिजलेली आणि त्याला अळ्या आणि सोंडे लागलेले दिसले. गावकऱ्यांनी तात्काळ शाळा व्यवस्थापन समिती, तंटामुक्त समिती व गावकऱ्यांची बैठक घेऊन सर्व प्रकाराची पाहणी केली.यापूर्वी कोरपना पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रवींद्र लामगे यांनी शाळेला भेट दिली होती. त्यात शालेय पोषण आहाराची चौकशी केली असता, धान्यामध्ये मोठी तफावत आढळून आली होती. त्यामुळे मुख्याध्यापिकेला कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली होती. गावकऱ्यांनी यासंबंधी शिक्षणमंत्री व शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांचेकडे १३ एप्रिल रोजी तक्रार केली. हे प्रकरण ताजेच असतानाच पुन्हा पोषण आहारात सोंडे निघाले. (वार्ताहर)