शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूपान घटकातून मजुरांना मिळणार सात कोटी रूपये

By admin | Updated: May 2, 2015 01:11 IST

मध्य चांदा वन विभागातील तेंदू घटकाचा लिलाव वनविभागाने निविदेद्वारे केला आहे.

राजुरा : मध्य चांदा वन विभागातील तेंदू घटकाचा लिलाव वनविभागाने निविदेद्वारे केला आहे. हे घटक खाजगी कंत्राटदारांनी खरेदी केले. या घटकातून यावर्षी ३७ हजार ५०० प्रमाणीत गोणी तेंदू पानाचे संकलन केले जाणार असून त्यातून अंदाजे सात कोटी रूपये तेंदूपत्ता मजुरांना मिळणार आहे.मध्यचांदा वन विभागातील तेंदू घटकाचा लिलाव निविदा द्वारा चार फेरीत करण्यात आला. या विभागातील बल्लारशाह रेंजमधील चार घटक, राजुरा रेंज मधील तीन घटक, कोठारी रेंजमधील सात घटक, धाबा रेंजमधील चार घटक, धाबा रेंजमधील चार घटक, विरूर रेंज दोन घटक, वनसडी रेंज एक घटक व जिवती रेंज मधील दोन घटक खासगी कंत्राटदारांनी खरेदी केले. तसेच पेसा अंतर्गत दहा घटकाची खाजगी कंत्राटदारांनी विक्री केली. पेसा अंतर्गत जिवती, पाटण, मारईपाटन, नवेगाव, पिपर्डा येथील ग्रामपंचायतीद्वारे स्वत: तेंदूपाने संकलन केले जाणार आहे.वन विभागाच्या २३ तेंदू घटकातून २९ हजार ५७० प्रमाणीत गोणी व पेसा अंतर्गत टेंभूरवाई, भेदोडा, अंतरगाव, येरगव्हाण, देवाडा, लक्कडकोट येथील दहा युनीट मधून ७८५० प्रमाणीत गोणी संकलन केले जाणार आहे. यावर्षी वन विभागाकडून प्रती प्रमाणीत गोणी (एक हजार पुडे) संकलन करण्यास १७५० रुपये दर दिला जाणार आहे. त्यामुळे या वनविभागातील हजारो मजुरांना जवळपास सात कोटी रुपये मजुरीपोटी मिळणार आहे. तसेच पेसा अंतर्गत जिवती, पाटण, मारईपाटण, नवेगाव, पिपर्डा येथील या ग्रामपंचायत द्वारा स्वत: तेंदूपाने संकलन करण्याचा ठराव पारित करून वनविभागास कळविल्यामुळे प्रथमच ग्रामपंचायत स्तरावरुन संकलनाचे काम करण्यात येणार आहे.यावर्षी तेंदूपाने संकलन करण्याचे काम मे महिन्याच्या प्रथम आठवड्यात सुरू होणार आहे. तेंदू पाने संकलन करण्याचे कार्य या परिसरातील आदिवासी व गोरगरीब लोकाकडून केले जाते. त्यामुळे या हंगामाकडे गोरगरीबांनी नजर लागून असते. तेंदू हंगामामुळे मजुरांना मोठी रक्कम मिळत असल्यामुळे आर्थिक समस्या दूर होते. अल्पशा कालावधीत हजारो रुपये कमाईचे तेंदूपत्ता साधन असल्यामुळे या कामावर कुटूंबातील सर्व सदस्य कार्य करतात व नगदी रक्कम घेऊन आपली आर्थिक टंचाईवर मात करतात. त्यामुळे तेंदूपाने हंगाम हा गोरगरीबाची पुरणपोळी म्हटले जाते. (तालुका प्रतिनिधी)