शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यामुळे वाढणार आरोग्य यंत्रणेवर ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST

पावसाळ्याच्या दिवसामध्ये साधारणत: डेग्यू, मेंदूज्वर, मलेरिया, चिकनगुणिया, कावीळ, टायफाईड आदी आजार बळावण्याची शक्यता असते. या आजारांपैकी बहुतांश आजारांच्या लक्षणांमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचा समावेश असतो. शिवाय हीच लक्षणे कोरोना या आजाराची आहेत.

ठळक मुद्देकाळजी घ्या : खासगी डॉक्टरांना द्यावी लागेल माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या जिल्हा तसेच आरोग्य प्रशासन कोरोना विषाणूशी झुंज देत आहेत. अशातच आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे अन्य आजारही बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवर कामाचा अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे. दरम्यान, खासगी डॉक्टरांनाही आता ताप, सर्दी, खोकला, घसादुखी आदींचा आजार असलेल्या आणि ट्रॅव्हल्स हिस्ट्री असलेल्या प्रत्येक रुग्णांची माहिती आरोग्य विभागाला द्यावी लागणार आहे.पावसाळ्याच्या दिवसामध्ये साधारणत: डेग्यू, मेंदूज्वर, मलेरिया, चिकनगुणिया, कावीळ, टायफाईड आदी आजार बळावण्याची शक्यता असते. या आजारांपैकी बहुतांश आजारांच्या लक्षणांमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचा समावेश असतो. शिवाय हीच लक्षणे कोरोना या आजाराची आहेत. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार करताना अशा प्रत्येक रुग्णांची नोंद घेत सदर रुग्णांची काही ट्रॅव्हल्स हिस्ट्री आहे काय किंवा तो कुठल्या कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आला काय, याची माहिती घेणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे, तसे आढळल्यास त्या रुग्णांची माहिती आरोग्य विभागाला देणे बंधनकारक आहे. तशा सूचनाही आरोग्य विभागाने जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांना दिल्या आहेत. या कामात खासगी डॉक्टरांनी हयगय केल्यास कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या पद्धतीने नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली त्याच पद्धतीने पावसाळ्यात सुद्धा घेणे गरजेचे आहे.स्वच्छतेवर द्या अधिक भरपावसाळ्यामध्ये बहुतांशवेळा आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वत: आणि परिसराची नियमित स्वच्छता करणे गरजेणे आहे. डेंग्यू, मलेरिया आदी किटकजन्य आजारांना आळा घालण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा तर जलजन्य आजारापासून दूर राहण्यासाठी स्वच्छ व निर्जंतूक पाणी प्यावे. पावसाळ्याच्या दिवसात प्रत्येक व्यक्तीने पाणी उकळून थंड करूनच प्यावे, वैयक्तिक आणि परिसर स्वच्छता ठेवल्यास आजाराला दूर ठेवता येईल.मास्क वापरताना घ्या काळजीयावर्षी कोरोनाच्या संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे प्रत्येकांनी आपले आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये नागरिकांनी पावसात भिजू नये, घराबाहेर पडताना मास्क लावूनच बाहेर पडावे. मास्क ओला झाल्यास काढून ठेवावा, यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असून कोरडा मास्कचा नागरिकांनी वापर करावा.पावसाळ्याच्या दिवसामध्ये साधारणत: विविध आजार तोंड बाहेर काढतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आरोग्यासंबंधी काळजी घ्यावी. वैयक्तिक आणि परिसराची स्वच्छता ठेवावी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडताना मास्क लावूनच बाहेर पडावे.- डॉ. निवृत्ती राठोडजिल्हा शल्य चिकित्कस, चंद्रपूर

टॅग्स :Healthआरोग्य