शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या २० टक्के भाडेवाढीविरुद्ध निदर्शने

By admin | Updated: November 13, 2015 01:11 IST

ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने एसटीच्या भाड्यात २० टक्के वाढ केली. ही वाढ गरीबांचे शोषण करणारी असून याविरुद्ध ...

काँग्रेसचे आंदोलन : जिल्हाधिकारी व आगार व्यवस्थापकांना निवेदनचंद्रपूर : ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने एसटीच्या भाड्यात २० टक्के वाढ केली. ही वाढ गरीबांचे शोषण करणारी असून याविरुद्ध चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय आणि एसटी महामंडळाच्या चंद्रपूर आगारात सोमवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. ही भाडेवाढ रद्द करण्यात यावी यासाठी निवेदनही देण्यात आले.राज्यात भाजप-शिवसेना सत्ता स्थापनेनंतर सर्वत्र महागाईने पाय पसरले आहे. अशातच दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने एस.टी.मध्ये २० टक्के भाडेवाढ केली. दुष्काळच्या छायेत असलेल्या राज्यात एस.टी. ची भाडेवाढ झाल्याने गरीबांच्या मुळावरच हे सरकार उठले की काय? असा प्रश्न कॉंग्रेसने उपस्थित केला आहे.ही भाडेवाढ अन्यायकारक आहे. त्यामुळे भाडेवाढ त्वरित मागे घेण्यात यावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि चंद्रपूर आगारापुढे निदर्शने करण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय हिवरे आणि आगार व्यवस्थापक घागरगुंडे यांना निवेदन देऊन भाडेवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्त्व चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे प्रमुख तथा काँग्रेसचे शहर सचिव महेश मेंढे यांनी केले. यावेळी काँग्रेसच्या किसान सेलचे जिल्हाध्यक्ष दिनेश चोखारे, मनपा स्थायी समिती सभापती संतोष लहामगे, माजी सभापती रामू तिवारी, माजी महापौर संगीता अमृतकर, चंद्रपूर पंचायत समिती माजी सभापती राजेश पचारे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा अश्विनी खोब्रागडे, चंद्रपूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष सचिन कत्याल, कुणाल चहारे, घुग्घुसच्या सरपंच पुष्पा मेश्राम, प्रकाश बोबडे, पवन अगदारी, नागेश बोंडे, जावेद कुरेशी, गुड्डू सिंग, प्रभाकर ताजने, चंदू माने, गणेश आवारी, हेमराज जुनघरे, पवन चनकापूरे, आकाश जुनघरे, देवराव भोयर, दिनेश मेश्राम, अनिल बावणे, चंदनसिंह, भारत चव्हाण, देवराव भोयर, शंकर काळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)